भारत विजयी सलामीसाठी सज्ज

By Admin | Published: March 15, 2016 03:29 AM2016-03-15T03:29:40+5:302016-03-15T03:29:40+5:30

तीन वेळा टी-२०चे विश्वविजेतेपद मिळविणारा बलाढ्य आॅस्टे्रलियाला व नंतर श्रीलंकेला टी-२० मालिकेत लोळवल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक

India is ready for the winning opener | भारत विजयी सलामीसाठी सज्ज

भारत विजयी सलामीसाठी सज्ज

googlenewsNext

बंगळुरू : तीन वेळा टी-२०चे विश्वविजेतेपद मिळविणारा बलाढ्य आॅस्टे्रलियाला व नंतर श्रीलंकेला टी-२० मालिकेत लोळवल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेसाठी आपली दावेदारी स्पष्ट केली. हाच फॉर्म कायम राखून विश्वचषक पटकावण्यासाठी सज्ज झालेला भारतीय महिला संघ मंगळवारी होणाऱ्या बांगलादेशाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे.
गेल्या काही मालिकांत चमकदार कामगिरी केल्याने यजमान भारताला उपांत्य फेरीसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. जानेवारी महिन्यात आॅस्टे्रलियाला त्यांच्याच भूमीत २-१ असे नमवल्यानंतर फेब्रुवारीमध्ये श्रीलंकेला ३-० असा व्हाइटवॉश देऊन भारताना प्रतिस्पर्धी संघांना धोक्याचा इशारा दिला. याआधी विश्वचषक टी-२० स्पर्धेत भारताने दोन वेळा उपांत्य फेरी गाठण्याची कामगिरी केली. मात्र, गेल्या दोन स्पर्धांत भारताला पहिल्याच फेरीतून गाशा गुंडाळावा लागला.
संघातील अनुभवी खेळाडू झूलन गोस्वामी व हरमनप्रीत कौर यांच्याकडे असलेल्या दीर्घ अनुभवामुळे त्यांच्यावर भारताची प्रमुख मदार असेल. याच वेळी भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारी व टी-२० क्रिकेटमध्ये हजारहून अधिक धावा काढणारी जगातील १३ फलंदाजांमध्ये समावेश असलेली कर्णधार मिताली राज भारताची हुकमी खेळाडू असेल. २०१४मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकानंतर मितालीने ३०.५०च्या सरासरीने १८३ धावा कुटल्या आहेत. हरमनप्रीतनेही गत विश्वचषकनंतर २३.४३च्या सरासरीने १६४ धावा काढल्या. दुखापतीतून सावरलेल्या झूलनने टी-२०मध्ये ४४ बळी घेऊन खालच्या क्रमांकावर ९९.६७च्या धावगतीने फटकेबाजीही केली आहे. गोलंदाजीत झूलनसह डावखुरी फिरकीपटू एकता बिष्ट व अनुजा पाटील यांच्याकडून संघाला आशा आहेत. दुसऱ्या बाजूला जहानारा आलमच्या नेतृत्वाखाली बांगलादेश आपली चमक दाखविण्यास मैदानात उतरेल. (वृत्तसंस्था)

आम्ही विजेतेपदाचे प्रबळ दावेदार : मिताली राज
बंगळुरू : आमच्या संघाची सध्याची कामगिरी पाहता, यंदाच्या ट्वेंटी-२० वर्ल्डकपच्या विजेतेपदाचे आम्हीच प्रबळ दावेदार आहोत, असे मत भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिने व्यक्त केले आहे.
सोमवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत मिताली म्हणाली, ‘‘आमचा संघ ज्या लयीत आहे. ते पाहता, सेमीफायनलपर्यंतचा प्रवास अवघड नाही. सेमीफायनलनंतर खरा कस लागणार आहे. आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दोन संघ बलाढ्य मानले जात होते; पण त्यांनाही अलीकडे बऱ्याच संघांनी हरवले आहे.’’

उभय संघ
भारत : मिताली राज (कर्णधार), झूलन गोस्वामी, एकता बिष्ट, राजेश्वरी गायकवाड, तिरुष कामिनी, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णस्वामी, स्मृती मंधाना, निरंजना नागराजन, शिखा पांडे, अनुजा पाटील,
दीप्ती शर्मा, वेलास्वामी वनिता, सुषमा वर्मा आणि पूनम यादव.
बांगलादेश : जहानार आलम (कर्णधार), सलमा खातून, निगार सुल्तान जोटी, पन्ना घोष, रुमाना अहमद, लता मंडल, रितू मोनी, आयशा रहमान, फाहिमा खातून, शरमीन अख्तर, फरगाना हक, खादिजा तुल कुबरा, नाहिदा अख्तर, शैली शारमीन आणि संदिजा इस्लाम.

सामन्याची वेळ
दुपारी ३.३० पासून
स्थळ :
चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू

Web Title: India is ready for the winning opener

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.