भारत उपांत्य फेरीत
By admin | Published: September 11, 2015 02:29 AM2015-09-11T02:29:20+5:302015-09-11T02:29:20+5:30
कर्णधार राणीने नोंदवलेल्या हॅट््ट्रिकच्या जोरावर भारतीय महिला संघाने गुरुवारी मलेशियाचा ९-१ ने पराभव करीत सातव्या महिला ज्युनिअर आशिया कप हॉकी स्पर्धेत उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले.
चांगझू : कर्णधार राणीने नोंदवलेल्या हॅट््ट्रिकच्या जोरावर भारतीय महिला संघाने गुरुवारी मलेशियाचा ९-१ ने पराभव करीत सातव्या महिला ज्युनिअर आशिया कप हॉकी स्पर्धेत उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले.
या लढतीत भारतीय संघाने सुरुवातीपासून वर्चस्व गाजवीत मोठ्या फरकाने विजय साजरा केला. कर्णधार राणी रामपाल भारतीय संघाच्या विजयाची शिल्पकार ठरली. राणीने आठव्या, ३७ व्या आणि ४२ व्या मिनिटाला गोल नोंदवले. जसप्रीत कौरने (१५ व ६० वा मिनिट) दोन गोल नोंदवीत कर्णधार राणीला योग्य साथ दिली. या व्यतिरिक्त प्रीती दुबे (३९ वा मिनिट), दीप ग्रेस एक्का (३९ वा मिनिट), नवनीत कौर (४१ वा मिनिट) आणि नवनीत बार्ला (५१ वा मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. मलेशियातर्फे एकमेव गोल सैयुती नोरफिजाह (३२ वा मिनिट) हिने केला. मध्यंतरापर्यंत भारताने ३-१ अशी आघाडी घेतली होती, पण दुसऱ्या सत्रात भारतीय खेळाडूंनी एकापाठोपाठ एक गोल नोंदवीत वर्चस्व गाजवले. (वृत्तसंस्था)