‘राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने खेळावे’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 02:55 AM2019-08-16T02:55:57+5:302019-08-16T02:56:46+5:30
राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजीला वगळल्यानंतर भारताने २०२२ बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी दिली.
Next
लंडन : राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजीला वगळल्यानंतर भारताने २०२२ बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी दिली. यावर ब्रिटन सरकारने हस्तक्षेप करत भारताच्या नेमबाजीसाठीच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.
ब्रिटनचे क्रीडामंत्री नायजेल अॅडम्स म्हणाले की, ‘भारत महत्त्वाचा राष्ट्रकुल देश आहे. भारताने राष्ट्रकुल क्रीडा महासंघाला (सीजीएफ) पत्राद्वारे नेमबाजीविषयी योग्य निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची उपस्थिती महत्त्वाची आहे. राष्ट्रकुलमधील नेमबाजीच्या उत्साहाची आम्हाला जाणीव आहे.’