प्रत्येक खेळात भारताचा डंका वाजायला हवा : पंतप्रधान

By Admin | Published: March 28, 2016 03:29 AM2016-03-28T03:29:17+5:302016-03-28T03:29:17+5:30

सन २0१७मध्ये भारतात होणाऱ्या फिफा अंडर-१७ वर्ल्डकपसाठी आतापासूनच वातावरण फुटबॉलमय होण्याची आवश्यकता असून, क्रिकेटप्रमाणेच प्रत्येक खेळात भारताचा डंका

India should stick to each and every sport: PM | प्रत्येक खेळात भारताचा डंका वाजायला हवा : पंतप्रधान

प्रत्येक खेळात भारताचा डंका वाजायला हवा : पंतप्रधान

googlenewsNext

नवी दिल्ली : सन २0१७मध्ये भारतात होणाऱ्या फिफा अंडर-१७ वर्ल्डकपसाठी आतापासूनच वातावरण फुटबॉलमय होण्याची आवश्यकता असून, क्रिकेटप्रमाणेच प्रत्येक खेळात भारताचा डंका वाजावा यासाठी युवकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
रविवारी रात्री आॅल इंडिया रेडीओवर ‘मन की बात’ कार्यक्रमात युवा वर्गाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, की क्रिकेटप्रमाणेच इतर खेळांतही भारताचा डंका सगळ्या जगात वाजला पाहिजे. कबड्डी, फुटबॉल, हॉकी, टेनिससुद्धा भारताच्या कानाकोपऱ्यात लोकप्रिय झाले पाहिजे. ते म्हणाले, नुकतेच आपल्या क्रिकेट संघाने पाकिस्तान आणि बांगलादेशविरुद्धचे सामने जिंकले. देशातील ६५ टक्के लोकसंख्या तरुण असल्याने खेळात क्रांती घडवून आणण्याची हीच योग्य वेळ आहे.
सन २0१७च्या युवा फुटबॉल विश्वचषकाबाबत बोलताना मोदी म्हणाले, पुढील वर्षी आपण एका मोठ्या स्पर्धेचे आयोजन करणार आहोत. फुटबॉल विश्वातील आघाडीचे २४ देश भारतात खेळण्यासाठी येत आहेत. फुटबॉलमध्ये १९५१ आणि १९६२ मध्ये आशियाई स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे, शिवाय १९५६च्या आॅलिम्पिकमध्ये भारत चौथ्या स्थानावर होता. (वृत्तसंस्था)

Web Title: India should stick to each and every sport: PM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.