भारत ‘अ’-श्रीलंका सराव सामना आज

By admin | Published: October 30, 2014 01:30 AM2014-10-30T01:30:03+5:302014-10-30T01:30:03+5:30

भारतात दाखल झालेल्या श्रीलंका संघाला मर्यादित षटकांचा सराव सामना उद्या गुरुवारी भारत ‘अ’ विरुद्ध येथील ब्रेबोर्न स्टेडियममध्ये खेळावा लागेल.

India A-Sri Lanka practice match today | भारत ‘अ’-श्रीलंका सराव सामना आज

भारत ‘अ’-श्रीलंका सराव सामना आज

Next
मुंबई : वेस्ट इंडिजने भारत दौरा अर्धवट सोडून पलायन केल्यानंतर उणीव भरून काढण्यासाठी तडकाफडकी भारतात दाखल झालेल्या श्रीलंका संघाला मर्यादित षटकांचा सराव सामना उद्या गुरुवारी भारत ‘अ’ विरुद्ध येथील ब्रेबोर्न स्टेडियममध्ये खेळावा लागेल.
भारत ‘अ’चे कोच संजय बांगर यांनी सरावानंतर पत्रकारांशी बातचीत करताना सांगितले की, पश्चिम विभागस ंघाकडून खेळताना गुडघ्याची दुखापत झालेला युवा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह याचे लंकेविरुद्ध उद्या खेळणो शंकास्पद आहे. त्याच्या जखमेचे एमआरआय स्कॅन करण्यात आले असून, त्याने लहान रनअपद्वारे सराव केला. त्याच्या खेळण्याविषयी शंका वाटते. अहमदाबादचा 2क् वर्षी बुमराह हा विंडीजविरुद्धच्या दोन्ही सराव सामन्यांत खेळला होता. त्याने तीन गडीदेखील बाद केले होते.’ 
रोहित शर्माच्या फिटनेसबाबत बांगर म्हणाला, की मुंबईचा हा फलंदाज उत्कृष्ट स्थितीत आहे. रोहितच्या मधल्या बोटाला इजा झाली होती. त्यावर बांगर म्हणाला, की फलंदाजीच्यावेळी त्रस जाणवणार नाही; पण क्षेत्ररक्षण करतेवेळी थोडे जपावे लागेल. शर्माच्या बोटाला इंग्लंडमध्ये पहिल्या वन-डे दरम्यान दुखापत झाली होती. उपचारानंतर दहा दिवसांपासून तो सराव करीत आहे.  त्याने काल बीकेसीवर 45 मिनिटे नेटमध्ये सराव केला.
भारत अ संघाकडे पाहुण्या संघाविरुद्ध चमक दाखविण्याची तसेच स्वत:ची उपयुक्तता सिद्ध करण्याची नामी संधी असेल. जे खेळाडू चांगली कामगिरी करु शकतात, अशाच खेळाडूंना भारत अ संघात निवडण्यात आल्याची माहिती बांगर यांनी दिली. विश्वचषक तोंडावर असल्याने आमचाही विचार करा, हे निवडकत्र्याना सांगण्यासाठी खेळाडूंकडे कामगिरी करण्याची संधी असेल. 
कर्णधार मनोज तिवारी म्हणाला, की मुंबईत विंडीजविरुद्ध आम्ही जे दोन सराव सामने खेळले, त्यातून दिल्लीचा सलामीवीर उन्मुक्त चंद यांचा आत्मविश्वास दुणावला. विंडीजविरुद्ध चांगली कामगिरी केल्यामुळे आमच्या खेळाडूंमध्ये आत्मविश्वास संचारला. मी उन्मुक्त चंद याच्या फलंदाजीवर फार भरवसा ठेवतो. करियरमध्ये आपण कुठे आहोत, हे जाणून घेण्याची संधी लंकेविरुद्धच्या सराव सामन्याद्वारे माङया सहका:यांना मिळणार आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
 
4भारत ‘अ’ : मनोज तिवारी (कर्णधार), जसप्रित बुम्रा, केदार जाधव, धवल कुलकर्णी, मनीष पांडे, संजु सॅमसन, रोहित शर्मा, स्टुअर्ट बिन्नी, उन्मुक्त चंद, कु लदीप यादव, करून नायर, परवेज रसूल, कर्न शर्मा,मनन वोरा़ 
4श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), निरोशान डिकवेला, लाहिरू गमागे, सुरज रनदीव, कुशल परेरा, धम्मिका प्रसाद, आशान प्रियंजन, उपुल थरंगा, चतुरंगा डिसिल्वा, तिलकरत्ने दिलशान, माहेला जयवर्धने, नुआन कुलशेखरा, थिसारा परेरा, एस़ प्रसन्ना, कुमार संगकारा़ 

 

Web Title: India A-Sri Lanka practice match today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.