भारताची धडाकेबाज सुरवात, १ बाद ११० धावा

By admin | Published: January 29, 2016 02:45 PM2016-01-29T14:45:29+5:302016-01-29T15:06:30+5:30

रोहित शर्मा (५२), शिखर धवन (३८) यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या बळावर भारताने पहिल्या १३ षटकानंतर १ गडी गमावत ११० धावा केल्या आहेत.

India started chasing a target of 110 runs in 1 overs | भारताची धडाकेबाज सुरवात, १ बाद ११० धावा

भारताची धडाकेबाज सुरवात, १ बाद ११० धावा

Next

ऑनलाइन लोकमत
मेलर्बन, दि. २९ - रोहित शर्मा (३२), शिखर धवन (४२) यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या बळावर भारताने पहिल्या १३ षटकानंत १ गड्याच्या मोबदल्यात ११० धावा केल्या आहेत. रोहित शर्माने धडाकेबाज अर्धशतक केले. धवन ४२ धावावर बाद झाला. सध्या विराट आणि रोहित मैदानावर आहेत

शर्मा आणि धवन जोडीने पावर प्ले मधील पहिल्या सहा षटकात तुफान फटकेबाजी करत भारताची चांगली धावसंख्या उभी केली आहे. भारताविरुद्धच्या दुस-या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या टी २० सामन्यात भारतीय संघात कोणताही बदल केला नाही. तर ऑस्ट्रेलिया संघात ३ बदल करण्यात आले, स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा आज खेळणार नाहीत, ग्लेन मॅक्‍सवेलने केले पुनरागमन; तर स्कॉट बोलँड, अँड्रयू टाय आणि नॅथन लिऑन या तिघांचे ट्‌वेंटी-२० मध्ये पदार्पण होत आहे.

पहिला सामना ३७ धावांनी जिंकून भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना जिंकल्यास सिडनीत अखेरच्या टी-२० त प्रयोग करण्याची भारताला संधी असेल

Web Title: India started chasing a target of 110 runs in 1 overs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.