भारत प्रबळ दावेदार

By admin | Published: January 12, 2016 04:12 AM2016-01-12T04:12:42+5:302016-01-12T04:12:42+5:30

यंदाचा टी-२० वर्ल्डकप भारतात होत असल्याने येथील वातावरणाचा फायदा, फिरकी गोलंदाजीला पोषक खेळपट्ट्यांवर खेळण्याची त्यांची क्षमता यांमुळे टीम इंडिया विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहे

India strong contenders | भारत प्रबळ दावेदार

भारत प्रबळ दावेदार

Next

मुंबई : यंदाचा टी-२० वर्ल्डकप भारतात होत असल्याने येथील वातावरणाचा फायदा, फिरकी गोलंदाजीला पोषक खेळपट्ट्यांवर खेळण्याची त्यांची क्षमता यांमुळे टीम इंडिया विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहे, असे मत भारताचा माजी जलदगती गोलंदाज झहीर खान याने व्यक्त केले आहे.
आयपीएल सोडून इतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या झहीरने सांगितले, की भारतीय संघ या स्पर्धेत शानदार प्रदर्शन करेल, यावर माझा पूर्ण विश्वास आहे.
भारतीय उपखंडात ही स्पर्धा होत असल्याने स्पर्धेत फिरकीचा बोलबाला राहील आणि जे फिरकीला चांगले खेळतात, त्यांची या स्पर्धेत चलती राहील. भारतीय संघ यामध्ये वरचढ राहील. आयसीसीच्या एका कार्यक्रमासाठी येथे आलेला
झहीर म्हणाला, ‘‘नवीन बदल होत आहेत; त्यामुळे खेळाची गती वाढत आहे.’’ (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: India strong contenders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.