विश्वचषक यजमानपदासाठी भारताचा कतारला पाठिंबा

By admin | Published: May 12, 2017 01:01 AM2017-05-12T01:01:16+5:302017-05-12T01:01:16+5:30

२०२२ मध्ये होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे यजमान कतारला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्यात येईल

India supports the queue for hosting the World Cup | विश्वचषक यजमानपदासाठी भारताचा कतारला पाठिंबा

विश्वचषक यजमानपदासाठी भारताचा कतारला पाठिंबा

Next

नवी दिल्ली : २०२२ मध्ये होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे यजमान कतारला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन अखिल भारतीय फुटबॉल संघटनेचे (एआयएफएफ) अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिली. बहारीन येथे आयोजित एएफसी २०१७ परिषदेमध्ये पटेल यांनी हे आश्वासन दिले.
या वेळी पटेल म्हणाले, ‘‘एएफसीचा वरिष्ठ उपाध्यक्ष आणि एआयएफएफचा अध्यक्ष या नात्याने मी कतार फुटबॉल संघटना आणि एससीच्या प्रयत्नांचे समर्थन करतो. नोव्हेंबर २०२२मध्ये कतार फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषविणार असल्याचा आनंद आहे.’’ त्याचबरोबर, कतारमध्ये वास्तव्यास असलेले भारतीय, २०२२ विश्वचषक स्पर्धेला यशस्वी करण्यात नक्कीच मोलाची भूमिका बजावतील, असेही पटेल यांनी या वेळी म्हटले. या वर्षी भारतात १७ वर्षांखालील फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. भारत आणि कतार एकत्रितपणे आशियाला जागतिक फुटबॉलची ताकद बनवतील, असेही पटेल यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

Web Title: India supports the queue for hosting the World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.