भारताने उपांत्य फेरीत पाकिस्तानला लोळवले
By Admin | Published: May 26, 2016 03:52 AM2016-05-26T03:52:08+5:302016-05-26T03:52:08+5:30
अनुभवी पंकज अडवाणीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दिमाखदार कामगिरी करताना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ३-० असा फडशा पाडून आशियाई स्नूकर
मुंबई : अनुभवी पंकज अडवाणीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दिमाखदार कामगिरी करताना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ३-० असा फडशा पाडून आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. स्पर्धेत सुवर्ण पदकावर कब्जा करण्यासाठी भारताचा पुढील सामना बलाढ्य इराणविरुद्ध होईल.
अबुधाबी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पंकज अडवाणीच्या नेतृत्त्वाखाली खेळताना भारतीय संघाने चमकदार खेळाचे प्रदर्शन केले. पहिल्या एकेरी लढतीत आदित्य मेहताना पाकिस्तानच्या मोहम्मद आसिफचा ७३-१६ असा धुव्वा उडवून भारताला १-० असे आघाडीवर नेले. यानंतर आशियाई सिक्स रेड स्नूकर चॅम्पियन पंकजने आपला हिसका दाखवताना असजद इक्बालला ८३-२५ असे लोळवले.
सलग दोंन विजयानंतर २-० अशी भक्कम आघाडी घेतलेल्या भारतीयांनी दुहेरीतही वर्चस्व राखले. पंकज - आदित्य यांनी आपला धडाका कायम राखताना आसिफ - असजद यांना ९२-८ असे लोळवून भारताला दिमाखात अंतिम फेरी गाठून देताना ३-० असा एकतर्फी विजय मिळवला.
तत्पूर्वी, भारताने संयुक्त अरब अमिरातला (यूएई) एकतर्फी सामन्यात ३-० असे लोळवून उपांत्य फेरी गाठली होती. आदित्यने पहिल्या एकेरीत अपेक्षित विजयी सुरुवात करताना यूएईच्या मोहम्मद शेहाबचा ८८-१५ असा फडशा पाडून भारताला १-० असे आघाडीवर नेले. पंकजने मोहम्मद अल जोकरचा ६७-१९ असा फडशा पाडून भारताला २-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. यानंतर दुहेरीत आदित्य - पंकज यांनी मोहम्मद शेहाब- मोहम्मल अल जोकर यांचा
५२-२१ असा पाडाव करुन भारताला उपांत्य फेरीत जागा मिळवून
दिली. (वृत्तसंस्था)
पहिल्या एकेरी लढतीत आदित्य मेहताना पाकिस्तानच्या मोहम्मद आसिफचा ७३-१६ असा धुव्वा उडवून भारताला १-० असे आघाडीवर नेले.
यानंतर आशियाई सिक्स
रेड स्नूकर चॅम्पियन पंकजने आपला हिसका दाखवताना असजद इक्बालला ८३-२५ असे लोळवले.