पाक दौरा रद्द करण्यासाठी भारताने आणले होते दडपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2015 12:57 AM2015-06-24T00:57:51+5:302015-06-24T00:57:51+5:30
झिम्बाब्वेने मे महिन्यात पाकिस्तानचा दौरा करू नये, यासाठी भारताची गृप्तहेर संघटना रॉ (रिसर्च अँड अॅनालिसीस विंग)ने पाहुण्या संघावर दडपण आणले होते,
कराची : झिम्बाब्वेने मे महिन्यात पाकिस्तानचा दौरा करू नये, यासाठी भारताची गृप्तहेर संघटना रॉ (रिसर्च अँड अॅनालिसीस विंग)ने पाहुण्या संघावर दडपण आणले होते, असा दावा पाकच्या पंजाब प्रांताचे गृहमंत्री शुजा खानजादा यांनी केला. लाहोरच्या पंजाब विधानसभेत भारतावर आरोप करीत खानजादा म्हणाले, ‘‘भारतीय गुप्तहेर एजन्सीने झिम्बाब्वेचा पाक दौरा रद्द करण्याचे पुरेपूर प्रयत्न केले. मेमध्ये हा दौरा पार पडला. झिम्बाब्वे गेल्या सहा वर्षांत पाकमध्ये येणारा पहिलाच संघ ठरला. झिम्बाब्वे संघ पाक दौऱ्यासाठी दुबईत दाखल होताच रॉच्या अधिकाऱ्यांनी संघाच्या व्यवस्थापकाला धमकीचे संदेश पाठवून तुम्ही जिवंत परत जाणार नाही, असे म्हटल्याचा आरोपही खानजादा यांनी केला.