वानखेडेवर रंगणार भारत-वेस्ट इंडिज उपांत्यफेरीचा थरार

By admin | Published: March 31, 2016 07:36 AM2016-03-31T07:36:19+5:302016-03-31T07:36:19+5:30

यजमान भारत आणि धमाकेदार वेस्ट इंडिज यांच्यात आज टी२० विश्वचषकामधील दुसरी उपांत्य लढत मुंबईत वानखेडे स्टेडियमवर खेळली जाणार आहे.

The India-West Indies semi-final thriller will be played at Wankhede | वानखेडेवर रंगणार भारत-वेस्ट इंडिज उपांत्यफेरीचा थरार

वानखेडेवर रंगणार भारत-वेस्ट इंडिज उपांत्यफेरीचा थरार

Next
style="text-align: justify;">नामदेव कुंभार
मुंबई, दि. ३० - यजमान भारत आणि धमाकेदार वेस्ट इंडिज यांच्यात आज टी२० विश्वचषकामधील दुसरी उपांत्य लढत मुंबईत वानखेडे स्टेडियमवर खेळली जाणार आहे. यासामन्याची दोन्ही संघांच्या खेळाडूंसोबतच सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. सोबतच विराट कोहली आणि ख्रिस गेल यांच्या दमदार खेळाकडेही सर्वांची लक्ष लागले आहे. टी२० विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्यासाठी एकेमेकांसमोर लढणार असून साऱ्या क्रिकेटजगताचे या लढतीकडे लक्ष असेल. 
 
तरीही, सर्वांची उस्तुकता असेल ती भारताच्या विराट कोहली आणि वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल यांच्या खेळीकडे. या दोघांच्या कामगिरीवर दोन्ही संघांचा विजय अवलंबून असेल. गोलंदाजीत भारताचे मुख्य अस्त्र रविचंद्रन अश्विन क्रिकेटचा गॉडझिला म्हणून ओळखाला जाणाऱ्या गेलचे हात बांधतो का? हे पाहणे लक्षवेधी ठरेल. आतापर्यंत अश्विनने एकूण नऊ टी२० सामन्यांमध्ये चार वेळा गेलची विकेट घेतली आहे. 
 
आयसीसी टी २०च्या रँकीक मध्ये आघाडीवर असलेला वेस्ट इंडिजचा गोलंदाज सॅम्युल बद्री भारताच्या प्रतिकूल परिस्थितीत आपल्या उच्च दर्जाच्या फलंदाजीने संघाला विजयाच्या ‘विराट’ मार्गावर आणणाऱ्या विराट कोहलीला धावा घेण्यापासून रोखतो का? हे आज होणाऱ्या टी २० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात समजेल. यामधून जिंकणारा संघ अंतिम फेरीत धडक मारेल.  
 
२००७ चा चॅम्पियन भारतीय संघ आणि २०१२ चा विजेता संघ वेस्टइंडिज यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये धमाकेदार मुकाबला बघायला मिळणार आहे. भारतीय संघाने याच मैदानावर ५ वर्षांआधी दुसरा वनडे वर्ल्डकप जिंकला होता. पॉईंट टेबलनुसार भारतीय संघ मजबूत स्थितीत असल्याचे दिसत आहे. पण तरीही काही खेळाडू चांगली कामगिरी करु शकले नाहीत. त्यामुळेच मॅचविनर खेळाडूंचा भरणा असलेल्या वेस्ट इंडिज विरुध्द गाफील राहण्याची चूक भारताला महागात पडेल.
 
भारताच्या स्पर्धेतील आतापर्यंतच्या वाटचालीत कोहलीचा सिंहाचा वाटा असल्याने त्याला रोखण्याचे मुख्य आव्हान विंडिजपुढे असून कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे कल्पक नेतृत्वही विंडिजसाठी मोठा अडथळा आहे. रोहित शर्मा - शिखर धवन यांनी अद्याप आपल्या क्षमतेनुसार खेळ केला नाही. सुरेश रैनाकडूनही भारताला मोठ्या अपेक्षा आहेत. त्यातच अनुभवी अष्टपैलू युवराज सिंग जखमी झाल्याने संघाबाहेर गेला असून त्याच्याजागी आलेल्या मनिष पांडेवर मोठी जबाबदारी असेल. तरी मुंबईकर अजिंक्य रहाणेला संधी न दिल्याबद्दल मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे. 
 
दुसरीकडे स्पर्धेआधी आपल्या बोर्डसह झालेल्या आर्थिक वादामुळे विंडिजचे मुख्य खेळाडू विश्वचषक न खेळण्याच्या पवित्रात होते. मात्र स्पर्धेला सुरुवात होताच त्यांनी धमाकेदार कामगिरीसह उपांत्य फेरी गाठली. तरी अखेरच्या साखळी सामन्यात दुबळ्या अफगाणिस्तानविरुद्धचा पराभव त्यांना सलत आहे. गेल त्याचा प्रमुख खेळाडू असून धडाकेबाज आंद्रे फ्लेचर संघाबाहेर गेल्याने त्यांना मोठा फटका बसला आहे. त्याच्या जागी आलेला लेंडल सिमन्सचा विंडिजला फायदा होईल. 
दोन्ही संघातील प्रमुख खेळाडूंची टी २० विश्वचषकातील कामगिरी : 
 
भारतीय फलंदाजी :
विराट कोहली : (१८४)
ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद ८२ धावांची आक्रमक खेळी
बांगलादेशविरुद्ध २४ धावा 
पाकिस्तानविरुद्ध नाबाद ५५ धावांची दमदार खेळी 
न्यूझीलंडविरुद्ध २३ धावा
 
महेंद्रसिंह धोनी : (७४)
ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १८
बांगलादेशविरुद्ध नाबाद १३
पाकिस्तानविरुद्ध नाबाद १३
न्यूझीलंडविरुद्ध ३० धावा 
 
शिखर धवन : (३६)
ऑस्ट्रेलियाविरुद्ध १३
बांगलादेशविरुद्ध २३
 
भारतीय गोलंदाजी : 
- हार्दिक पंड्या : (४)
ऑस्ट्रेलियाविरुध्द ३६ धावात २ विकेट 
बांगलादेशविरुद्ध २९ धावात २ विकेट 
- आर. आश्विन : (५)
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३१ धावात १ विकेट 
बांगलादेशविरुद्ध २० धावात २ विकेट 
न्यूझीलंडविरुद्ध ३२ धावात १ विकेट 
- आशिष नेहरा : (४)
ऑस्ट्रेलियाविरुद्ध २० धावात १ विकेट 
बांगलादेशविरुद्ध २९ धावात १ विकेट
पाकिस्तानविरुद्ध २० धावात १ विकेट 
- रविंद्र जडेजा :(५)
बांगलादेशविरुद्ध २२ धावात २ विकेट 
पाकिस्तानविरुद्ध २० धावात १ विकेट 
न्यूझीलंडविरुद्ध २६ धावात १ विकेट 
- न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात आर. आश्विन, आशिष नेहरा, जसप्रीत बुमराह , सुरेश रैना, रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली होती
--------
वेस्टइंडिज फलंदाजी : -
- जानसन चार्ल्स : (५४)
अफगाणिस्तानविरुद्ध २२
 दक्षिण आफ्रिकाविरुद्ध ३२
 
- ख्रिस गेल (१०४)
इग्लंडविरुद्ध ९४ चेंडूत नाबाद १००
 
- मर्लोन सॅम्युल : (८०)
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४३
इंग्लंडविरुद्ध ३७
- ड्वेन ब्रावो :
अफगाणिस्तानविरुद्ध २८
 
गोलंदाजी :
सॅम्युल बद्री : (६)
अफगाणिस्तानविरुद्ध १४ धावात ३ विकेट
आंद्रे रसेल : (७)
अफगाणिस्तानविरुद्ध २३ धावात २ विकेट
- ड्वेन ब्रावो : (६)
दक्षिण आफ्रिकेविरुध्द २० धावात २ विकेट 
श्रीलंकेविरुद्ध २० धावात २ विकेट
- ख्रिस गेल :
दक्षिण आफ्रिकाविरुध्द १७ धावात २ विकेट 
 
भारत वेस्ट इंडिजमध्ये एकूण ४ टी २० सामने झाले आहेत, दोन्ही संगाने २-२ जिंकले आहेत.
भारतीय संघाचे टी-२० सामने : ७४ 
विजयी : ४६; पराभूत २६; निकाल नाही ०१
 
 वेस्टइंडिज संघाचे टी-२० सामने : ७७
विजयी ३७; पराभूत ३५; निकाल नाही ०१

Web Title: The India-West Indies semi-final thriller will be played at Wankhede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.