भारत अ चौरंगी मालिका खेळणार
By admin | Published: June 2, 2016 02:10 AM2016-06-02T02:10:15+5:302016-06-02T02:10:15+5:30
आगामी आॅगस्ट महिन्यात भारत ‘अ’ संघ आॅस्टे्रलियामध्ये चौरंगी एकदिवसीय मालिका खेळणार असून यानंतर आॅस्टे्रलिया ‘अ’विरुद्ध दोन चारदिवसीय सामने खेळेल
मेलबर्न : आगामी आॅगस्ट महिन्यात भारत ‘अ’ संघ आॅस्टे्रलियामध्ये चौरंगी एकदिवसीय मालिका खेळणार असून यानंतर आॅस्टे्रलिया ‘अ’विरुद्ध दोन चारदिवसीय सामने खेळेल, असे क्रिकेट आॅस्टे्रलियाने (सीए) बुधवारी स्पष्ट केले. आॅस्टे्रलियाने दक्षिण आफ्रिका ‘अ’ आणि अन्य एका आंतरराष्ट्रीय संघाविरुद्ध चौरंगी एकदिवसीय मालिकेसाठी आपल्या ‘अ’ तसेच नॅशनल परफॉर्मन्स संघाची घोषणा केली. या वेळी त्यांनी मालिकेतील चौथा संघ भारत असल्याचे घोषित केले.
या चौरंगी मालिकेत एकूण १८ सामने असून मॅके, ब्रिस्बेन आणि टाऊन्सविले येथे ३० दिवस क्रिकेट खेळले जाईल. भारत ‘अ’ संघ टाऊन्सविले आणि मॅके येथे संपूर्ण आॅगस्ट महिनाभर चौरंगी मालिका खेळेल आणि त्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला ब्रिस्बेन येथे आॅस्टे्रलिया ‘अ’विरुद्ध २ चारदिवसीय सामने खेळेल.
‘सीए’चे कार्यकारी व्यवस्थापक पैट होवार्ड यांनी सांगितले, ‘‘भारत ‘अ’च्या सहभागामुळे स्पर्धा अधिक आव्हानात्मक व चुरशीची झाली आहे. युवा खेळाडूंच्या गुणवत्तेला व त्यांच्या विकासासाठी ही स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरेल. आॅस्टे्रलियाला ‘अ’ आणि नॅशनल परफॉर्मन्स टीमची निवड करण्यात आली असून राष्ट्रीय निवडकर्ते या स्पर्धेकडे उत्सुकतेने लक्ष देतील.’’ तसेच ‘‘या मालिकेत भारत व दक्षिण आफ्रिका संघ खूप मजबूत आहेत. यामुळे ही मालिका आमच्या खेळाडूंसाठी मोठे आव्हान असेल. या मालिकेतून प्रत्येक खेळाडूला खूप काही शिकण्याची संधी मिळेल,’’ असेही होवार्ड यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
वेळापत्रक
चौरंगी एकदिवसीय मालिका :
१३ आॅगस्ट : दक्षिण आफ्रिका ‘अ’ वि. नॅशनल परफॉर्मन्स (एनपीएस)
१४ आॅगस्ट : आॅस्टे्रलिया ‘अ’ वि. भारत ‘अ’
१६ आॅगस्ट : आॅस्टे्रलिया ‘अ’ वि. एनपीएस
१७ आॅगस्ट : द. आफ्रिका ‘अ’ वि. भारत ‘अ’
२० आॅगस्ट : आॅस्टे्रलिया ‘अ’ वि. द. आफ्रिका ‘अ’
२१ आॅगस्ट : भारत ‘अ’ वि. एनपीएस
२४ आॅगस्ट : एनपीएस वि. आॅस्टे्रलिया ‘अ’
२५ आॅगस्ट : द. आफ्रिका ‘अ’ वि. भारत ‘अ’
२७ आॅगस्ट : एनपीएस वि. भारत ‘अ’
२८ आॅगस्ट : आॅस्टे्रलिया ‘अ’ वि. द. आफ्रिका ‘अ’
३० आॅगस्ट : आॅस्टे्रलिया ‘अ’ वि. भारत ‘अ’
३१ आॅगस्ट : द. आफ्रिका ‘अ’ वि. एनपीएस
३ सप्टेंबर : अंतिम सामना (तृतीय संघ वि. चौथा संघ)
४ सप्टेंबर : अंतिम सामना (पहिला संघ वि. दुसरा संघ)
चारदिवसीय सामने मालिका :
३० जुलै ते २ आॅगस्ट: आॅस्टे्रलिया ‘अ’ वि. द. आफ्रिका ‘अ’
६ ते ९ आॅगस्ट : आॅस्टे्रलिया ‘अ’ वि. द. आफ्रिका ‘अ’
८ ते ११ सप्टेंबर : आॅस्टे्रलिया ‘अ’ वि. भारत ‘अ’
१५ ते १८ सप्टेंबर : आॅस्टे्रलिया ‘अ’ वि. भारत ‘अ’