श्रीलंकेमध्ये त्रिकोणीय टी-20 मालिका खेळणार भारत

By admin | Published: March 16, 2017 01:43 PM2017-03-16T13:43:48+5:302017-03-16T13:43:48+5:30

भारत, बांगलादेश आणि श्रीलंका या संघांमध्ये त्रिकोणीय मालिका होणार

India will play triangular T20 series in Sri Lanka | श्रीलंकेमध्ये त्रिकोणीय टी-20 मालिका खेळणार भारत

श्रीलंकेमध्ये त्रिकोणीय टी-20 मालिका खेळणार भारत

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - भारत, बांगलादेश आणि श्रीलंका या संघांमध्ये पुढील वर्षी मार्च महिन्यात त्रिकोणीय टी-20 मालिका होणार आहे. श्रीलंकेत ही मालिका खेळवली जाईल. श्रीलंका क्रिकेटने (एसएलसी) बुधवारी याबाबत घोषणा केली. 
 
श्रीलंकेचा संघ पुढील वर्षी भारतात 3 कसोटी, 5 वन-डे आणि 2 टी-20 सामने खेळणार होता. मात्र, यामध्ये बदल करण्यात आला असून काही वन-डे सामन्यांच्या जागी टी-20 सामने खेळवले जातील . श्रीलंका आणि बांगलादेश क्रिकेट मंडळाला आर्थिक लाभ व्हावा या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे.   
 
आयसीसीच्या बैठकांमध्ये श्रीलंका नेहमी भारताचं समर्थन करतं आता बांगलादेश मंडळही भारताच्या बाजुने आलं आहे. पण फेब्रुवारीमध्ये झालेल्या आयसीसीच्या बैठकीत बांगलादेशने भारताविरोधात मतदान केलं होतं.  
 
'निदाहास ट्रॉफी' असं या मालिकेचं नाव असणार आहे. या मालिकेसाठी श्रीलंकेच्या भारत दौ-यातील किती सामने रद्द केले आहेत याबाबत अजून माहिती देण्यात आलेली नाही. 
 
 
  
 
 
 
 

Web Title: India will play triangular T20 series in Sri Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.