बेल्जियम दौरा : भारताने दिला विश्वविजेत्यांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 12:23 AM2019-10-04T00:23:57+5:302019-10-04T00:24:20+5:30

भारतीय पुरुष हॉकी संघाने जागतिक आणि युरोपिय विजेत्या बेल्जियमला पाचव्या व अखेरच्या सामन्यात ५-१ असे लोळवले.

India win over Belgium | बेल्जियम दौरा : भारताने दिला विश्वविजेत्यांना धक्का

बेल्जियम दौरा : भारताने दिला विश्वविजेत्यांना धक्का

Next

एंटवर्प : भारतीय पुरुष हॉकी संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखताना जागतिक आणि युरोपिय विजेत्या बेल्जियमला पाचव्या व अखेरच्या सामन्यात ५-१ असे लोळवले. यासह भारतीयहॉकी संघाने बेल्जियम दौऱ्याची विजयी सांगता करतानाच एकही पराभव पत्करला नाही.
जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या भारताने या दौºयात धमाकेदार कामगिरी करताना पाचही सामने जिंकले. पहिल्या सामन्यात बेल्जियमला २-० असे नमविल्यानंतर भारताने पुढील दोन सामन्यात स्पेनला ६-१ आणि ५-१ असे पराभूत केले. यानंतरचे दोन्ही सामने भारताने २-१, ५-१ अशा फरकाने जिंकले. मालिकेतील अखेरच्या सामन्यात सिमरनजीत सिंग (७वे मिनिट), ललित कुमार उपाध्याय (३५), विवेक सागर प्रसाद (३६), हरमनप्रीत सिंग (४२) आणि रमनदीप सिंग (४३) यांनी प्रत्येकी एक गोल करत भारताचा विजय साकारला. मध्यरक्षक, बचावफळी, आक्रमक आणि गोलरक्षक अशा सर्वानीच
आपापली जबाबदारी योग्यपणे सांभाळताना शानदार सांघिक खेळ केला.
भारताच्या आक्रमणाला तोडिस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न केलेल्या बेल्जियमला अखेरपर्यंत भारताचे भक्कम संरक्षण भेदण्यात अपयश आले. बेल्जियमला सामन्यात तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने भक्कम बचाव करत यजमानांचे आक्रमक परतावून लावले. मात्र ३९व्या मिनिटाला भारताच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारलेल्या अलेक्झांडर हेंड्रिक्स याने गोल करत यजमानांचा पहिला गोल साकारला. मात्र यानंतर वर्चस्व राहिले ते केवळ भारतीयांचेच. आक्रमक व बचावफळी यांनी अप्रतिम ताळमेळ साधत यजमानांना पुनरागमनाची एकही संधी न देता बाजी
मारली.

Web Title: India win over Belgium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.