India wins Silver : भारताच्या यंग ब्रिगेडने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक! १२ तासांपूर्वी स्पर्धा ठिकाणी झालेले दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 08:40 AM2022-08-03T08:40:47+5:302022-08-03T08:41:47+5:30

२० वर्षांखालील जागतिक अ‍ॅथलॅटिक्स स्पर्धेत भारताच्या युवा ब्रिगेडने पदक पटकावले

India wins Silver medal in the mixed 4x400m relay in the World U20 Athletics Championship at Cali with another stupendous performance of 3:17.76s | India wins Silver : भारताच्या यंग ब्रिगेडने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक! १२ तासांपूर्वी स्पर्धा ठिकाणी झालेले दाखल

India wins Silver : भारताच्या यंग ब्रिगेडने जागतिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक! १२ तासांपूर्वी स्पर्धा ठिकाणी झालेले दाखल

googlenewsNext

India wins Silver medal in World U20 Athletics Championship - राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडू पदकांची लयलूट करत असताना २० वर्षांखालील जागतिक अ‍ॅथलॅटिक्स स्पर्धेत भारताच्या युवा ब्रिगेडने पदक पटकावले. व्हीसा समस्येमुळे १२ तास आधीच स्पर्धा ठिकाणी भारतीय खेळाडू दाखल झाले होते. त्यामुळे त्यांची कामगिरी कशी होईल याची सर्वांना चिंता होती. पण त्यांनी कमाल केली आणि रौप्यपदक जिंकले..

व्हीसा समस्येमुळे भारतीय खेळाडू स्पर्धेत दाखल होणार की नाही अशी धाकधूक होती, परंतु भारतीय अ‍ॅथलॅटिक्स महासंघाने समस्याच सोडवली. स्पर्धा सुरू होण्याच्या १२ तास आधी भरत श्रीधर, प्रिया, कपिल व रुपल हा रिले संघ Cali येथे दाखल झाला. त्यांनी ३:१७.७६ सेकंदाची वेळ नोंदवून रौप्यपदक पटकावले. अमेरिकेने सुवर्ण, तर जमैकाने कांस्यपदक जिंकले. 

प्रिया, कपिल व श्रीधर यांचे हे जागतिक स्पर्धेतील दुसरे पदक ठरले. त्यांनी २०२१ मध्ये नैरोबी येथे पार पडलेल्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. 

Web Title: India wins Silver medal in the mixed 4x400m relay in the World U20 Athletics Championship at Cali with another stupendous performance of 3:17.76s

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.