मितालीच्या खेळीने भारत विजयी

By admin | Published: February 8, 2016 03:41 AM2016-02-08T03:41:55+5:302016-02-08T03:41:55+5:30

मिताली राजच्या ८९ धावांच्या शानदार खेळीच्या बळावर भारताने आॅस्ट्रेलियाविरुद्ध महिलांच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात रविवारी १८ चेंडू व ५ गडी राखून विजय मिळवला.

India won by Mithali | मितालीच्या खेळीने भारत विजयी

मितालीच्या खेळीने भारत विजयी

Next

होबार्ट : मिताली राजच्या ८९ धावांच्या शानदार खेळीच्या बळावर भारताने आॅस्ट्रेलियाविरुद्ध महिलांच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात रविवारी १८ चेंडू व ५ गडी राखून विजय मिळवला. त्याचबरोबर मितालीने आॅस्ट्रेलियाला सफायापासून रोखण्यात यशही मिळवले. महाराष्ट्राच्या स्मृती मंधाना हिनेही ५२ चेंडूंत ७ चौकारांसह
५५ धावा फटकावताना भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
आॅस्ट्रेलियाने निर्धारित ५0 षटकांत ७ बाद २३१ धावा केल्या. त्यानंतर मितालीच्या ११३ चेंडूंतील १२ चौकारांसह फटकावलेल्या ८९ धावांच्या खेळीच्या बळावर भारताने विजयी लक्ष्य ४७ व्या षटकांत ५ बाद २३२ धावा करीत गाठले. आॅस्ट्रेलियाने अखेरचा वनडे सामना गमावल्यानंतर ही तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. भारताने याआधी आॅस्ट्रेलियाविरुद्ध टष्ट्वेंटी-२0 मालिका २-१ फरकाने जिंकली होती. भारताने अखेरचा वनडे सामना जिंकताना आॅस्ट्रेलिया दौऱ्याचा समारोप विजयाने केला.संक्षिप्त धावफलक : आॅस्ट्रेलिया : ५0 षटकांत ७ बाद २३१. (ए. ब्लॅकवेल ६0, पेरी ५0. शिखा पांडे ३/५0, राजेश्वरी गायकवाड २/४१).
भारत : ४७ षटकांत ५ बाद २३४. (स्मृती मंधाना ५५, मिताली राज ८९, पूनम राऊत २४, एच. कौर २२. पेरी २/५0).

Web Title: India won by Mithali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.