भारताने आॅस्ट्रेलिया ‘अ’ला गुंडाळले

By admin | Published: September 10, 2016 03:45 AM2016-09-10T03:45:18+5:302016-09-10T03:45:18+5:30

कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाला २२८ धावांत गुंडाळत पहिल्या डावात २ धावांची आघाडी मिळाली.

India wrapped up Australia A | भारताने आॅस्ट्रेलिया ‘अ’ला गुंडाळले

भारताने आॅस्ट्रेलिया ‘अ’ला गुंडाळले

Next


ब्रिस्बेन : वेगवान गोलंदाज वरुण अ‍ॅयोन आणि आॅफस्पिनर जयंत यादव यांनी घेतलेल्या प्रत्येकी ३ बळींच्या जोरावर भारत ‘अ’ संघाला पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाला २२८ धावांत गुंडाळत पहिल्या डावात २ धावांची आघाडी मिळाली.
भारत ‘अ’ संघाने पहिल्या डावात मनीष पांडे (७७) याच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या बळावर २३0 अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघ २२८ धावांत गारद झाला. भारत ‘अ’ संघाने दिवसअखेर दुसऱ्या डावात १२ षटकांत २ बाद ४४ धावा केल्या. भारताची आता एकूण आघाडी ४६ धावांची झाली आहे. दुसऱ्या डावात अखिल हेरवाडकर २३ धावा व फैज फजल ६ धावांवर बाद झाला. श्रेयस अय्यर सहा आणि मनीष पांडे ७ धावांवर खेळत आहेत.
आज सकाळी आॅस्ट्रेलियाने त्यांचा डाव बिनबाद २५ या धावसंख्येवरून पुढे सुरू केला. आॅस्ट्रेलियन संघ एकवेळ जो बर्न्स (७८) आणि कर्णधार पीटर हँडस्कॉम्ब (८७) यांच्या शानदार अर्धशतकी खेळीमुळे २ बाद १५७ अशा मजबूत स्थितीत होता; परंतु त्यानंतर यजमान संघाने त्यांचे अखेरचे ८ फलंदाज फक्त ७१ धावांत गमावले.
कर्णधार हँडस्कॉम्बने ९३ चेंडूंत १५ चौकार व एका षटकारासह ८७ धावांचे योगदान दिले. जो बर्न्सने १२५ चेंडूंत ११ चौकार व एका षटकारासह ७८ धावा केल्या. भारताकडून वेगवान गोलंदाज वरुण अ‍ॅरोन याने १४. षटकांत ४१ धावांत ३ गडी बाद केले. त्याला आॅफ स्पिनर जयंत यादव याने १२ षटकांत ४४ धावांत ३ बळी घेत तोडीची साथ दिली. याशिवाय हार्दिक पांड्याने १0 षटकांत ३३ धावांत २ आणि शार्दूल ठाकूरने ४५ धावांत १ गडी बाद केला.

>संक्षिप्त धावफलक
भारत ‘अ’ (पहिला डाव) : २३0 आणि १२ षटकांत २ बाद ४४.
आॅस्ट्रेलिया ‘अ’ (पहिला डाव) : २२८. (बर्न्स ७८, हँड्स्कॉम्ब ८७, अ‍ॅरान ३/४१, जयंत यादव ३/४४).

Web Title: India wrapped up Australia A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.