भारतीय फलंदाज अडकले फिरकीच्या जाळ्यात

By Admin | Published: September 22, 2016 09:16 AM2016-09-22T09:16:54+5:302016-09-22T19:34:30+5:30

भारतीय फलंदाजी न्यूझीलंडच्या फिरकी जाळ्यात अलगद अडकताच ऐतिहासिक ५०० व्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर गुरुवारी ९ बाद २९१ अशी स्थिती झाली.

Indian batsmen trapped spin | भारतीय फलंदाज अडकले फिरकीच्या जाळ्यात

भारतीय फलंदाज अडकले फिरकीच्या जाळ्यात

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत 

कानपूर, दि. २२ : मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांच्या अर्धशतकी खेळीमुळे एकवेळ भक्कम स्थितीत असलेली भारतीय फलंदाजी न्यूझीलंडच्या फिरकी जाळ्यात अलगद अडकताच ऐतिहासिक ५०० व्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर गुरुवारी ९
बाद २९१ अशी स्थिती झाली. ग्रीन पार्कच्या खेळपट्टीवर फिरकीला साथ मिळत असल्याने भारताच्या या धावा तशा पुरेशा मानल्या जात आहेत. दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी रवींद्र जडेजा १६ आणि उमेश यादव ८ धावांवर नाबाद होते. भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीघेतल्यानंतर मुरली(६५) आणि पुजारा (६२) यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांचा खेळपट्टीवर निभाव लागला नाही. मुरली- पूजारा यांनी दुसऱ्या गड्यासाठी ११२ धावांची भागीदारी केली. हे दोघे मोठी खेळी करतील असे वाटत असताना दोघेही पाठोपाठ बाद झाले. अजिंक्य रहाणे १८ आणि रोहित शर्मा ३५ यांनी काहीवेळ पडझड थोपविली पण चांगल्या सुरुवातीचा लाभ उठविण्यात त्यांनाही अपयश आले. रविचंद्रन अश्विनने कलात्मक फलंदाजीचा परिचय देत ४० धावा केल्या.

अश्विन २०१६ मध्ये कसोटीत सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक बळी घेणारा खेळाडू ठरला. भारताची पडझड तिसऱ्या सत्रात झाली. या सत्रात ३१ षटकांत १०६ धावा निघाल्या पण पाच फलंदाज तंबूत परतले. पहिल्या दिवसापासून फिरकीपटूंना खेळपट्टी पूरक ठरली. न्यूझीलंडकडून पाच बळी फिरकीपटूंनी मिळविले. त्यात मिशेल सेंटनरने ७७ धावांत तीन तर ईश सोढी आणि मार्क क्रेग यांनी एकेक गडी बाद केला. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने ५२ धावांत तीन गडी बाद केले. नील वॅगनर याने कोहलीला बाद केले.
सलामीवीर लोकेश राहुलने ३९ चेंडूत ३२ धावांचे योगदान दिले. तो बाद झाल्यानंतर मुरली आणि पुजारा यांनी आत्मविश्वासाने फिरकी मारा खेळून काढला. विजयने ४० व्या षटकांत ३१ वे कसोटी अर्धशतक गाठले. पुजाराने देखील आठवे अर्धशतक नोंदविले. १०९ चेंडूत ८ चौकार ठोकणारा पुजारा सेंटनरच्या चेंडूवर त्याच्याकडेच झेल देत बाद झाला. कर्णधार कोहलीने आल्याआल्या आक्रमकपणे चौकार मारला खरा पण नील वॅगनरच्या फसव्या बाऊन्सरला बळी पडून
त्याने सीमारेषेवर झेल दिला.

चहापानाला पाच मिनिटे शिल्लक असताना मुरली पॅव्हेलियनमध्ये परतला. सोढीच्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर त्याने यष्टिरक्षक वाटलिंगकडे झेल दिला. त्यावेळी भारताच्या ४ बाद १८५ धावा होत्या. यानंतर नियमित फरकाने गडी बाद होत गेले. त्यातही रोहित- अश्विन यांनी सहाव्या गड्यासाठी ५२ धावांची भागीदारी केली. ८० व्या षटकानंतर हे दोघेही बाद झाले. रोहितने
बक्षिसाच्या रूपात स्वत:चा बळी दिला. बोल्टने रिद्धिमान साहा(००) याची दांडी गूल केल्यानंतर पुढच्या षटकांत अश्विनला (७६ चेंडू, ७ चौकार) देखील गलीमध्ये रॉस टेलरकरवी झेलबाद केले. दिवसाचा खेळ संपताना त्यानेच मोहम्मद शमीची दांडी उडविली.

धावफलक
भारत पहिला डाव: लोकेश राहुल गो. वॉटलिंग गो सँटेनर ३२, मुरली विजय झे. वॉटलिंग गो. सोढी ६५,चेतेश्वर पूजारा झे. आणि गो. सेंटेनर ६२, विराट कोहली झे. आणि गो.वॅगनर ९, अजिंक्य रहाणे झे. लॉथम गो. क्रेग १८, रोहित शर्मा झे. सोढी गो. सँटेनर ३५, रविचंद्रन अश्विन झे. टेलर गो. बोल्ट ४०, रिद्धिमान साहा त्रि. गो. बोल्ट ००, रवींद्र जडेजा खेळत आहे १६, मोहम्मद
शमी त्रि. गो. बोल्ट ००, उमेश यादव खेळत आहे ८, अवांतर ६, एकूण: ९० षटकात
९ बदा २९१ धावा.

गडी बाद क्रम: १/४२, २/१५४, ३/१६७, ४/१८५, ५/२०९.६/२६१. ७/२६३,८/२७३, ९/२७७. गोलंदाजी: बोल्ट १७-२-५७-३, वॅगनर १४-३-४२-१. सेंटनर २०-२-७७-३, क्रेग २४-६-५९-१, सोढी १५-३-५०-१.

Web Title: Indian batsmen trapped spin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.