भारतीय फलंदाजांचा ‘फ्लॉप शो’

By Admin | Published: August 8, 2014 01:00 AM2014-08-08T01:00:33+5:302014-08-08T01:00:33+5:30

आजपासून प्रारंभ झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी चहापानाच्या ठोक्याला भारताचा पहिला डाव 152 धावांत गुंडाळला.

Indian batting 'flop show' | भारतीय फलंदाजांचा ‘फ्लॉप शो’

भारतीय फलंदाजांचा ‘फ्लॉप शो’

googlenewsNext
>वेगवान गोलंदाजीला अनुकूल वातावरणात इंग्लंडच्या गोलंदाजांनी अचूक मारा करीत आजपासून प्रारंभ झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी चहापानाच्या ठोक्याला भारताचा पहिला डाव 152 धावांत गुंडाळला. कर्णधार महेंद्रसिंह धोनी (71 धावा, 14 चौकार), रविचंद्रन आश्विन (4क्) व अजिंक्य रहाणो (24) यांचा अपवाद वगळता भारताच्या अन्य फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली.
स्टुअर्ट ब्रॉडने 25 धावांच्या मोबदल्यात 6 बळी घेत भारताचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याला जेम्स अॅन्डरसन (3-46) व ािस व्होक्स (1-27) यांची योग्य साथ लाभली. धोनी व अश्विन यांनी सातव्या विकेटसाठी केलेली 74 धावांची भागीदारी भारताच्या डावातील सर्वात मोठी भागीदारी ठरली. भारताच्या डावात 6 फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. एका डावात खाते उघडण्यात अपयशी ठरलेल्या फलंदाजांच्या संख्येचा विचार करता, भारताने आज या अनोख्या विश्वविक्रमाची बरोबरी केली. 
भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर नाणोफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. पण आघाडीच्या फलंदाजांना त्याचा लाभ घेता आला नाही. जेम्स अॅन्डरसन व स्टुअर्ट ब्रॉड यांनी सुरुवातीला 5.1 षटकांत केवळ 8 धावांच्या मोबदल्यात 4 फलंदाजांना माघारी परतवत भारताचा डाव अडचणीत आणला. जवळजवळ दीड वर्षाच्या कालावधीनंतर कसोटी सामना खेळणारा सलामीवीर गौतम गंभीर (4) बाद होणारा पहिला फलंदाज ठरला. ब्रॉडच्या गोलंदाजीवर त्याचा उडालेला ङोल गलीमध्ये तैनात क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावला. मुरली विजय (क्), विराट कोहली (क्) व चेतेश्वर पुजारा (क्) यांना खातेही उघडता आले नाही. अजिंक्य रहाणो (24) व महेंद्रसिंग धोनी यांनी पाचव्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी करीत डाव सावरण्याच्या आशा निर्माण केल्या. ािस जॉर्डनने रहाणोला माघारी परतवत ही भागीदारी संपुष्टात आणली. दुस:या सत्रच्या सुरुवातीला जडेजा (क्)माघारी परतला. त्याआधी, सकाळी पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ अर्धा तास उशिरा प्रारंभ झाला. 
 
1952 इंग्लंडने या मैदानावर भारताचा एक डाव 2क्7 धावांनी पराभव केला होता. त्यावेळी भारतीय संघ पहिल्या डावात 21.4 षटकात 58 तर दुस:या डावात 36.3 षटकात 82 धावात गारद झाला होता. 
1959 इंग्लंडने या सामन्यात भारताचा एक डाव 59 धावांनी पराभव केला होता. पहिल्या डावात भारतोन पहिल्या डावांत 2क्6 तर दुस:या डावात 157 धावा केल्या होत्या. 
 
भारत पहिला डाव :- मुरली विजय ङो. कुक गो. अॅण्डरसन क्क्, गौतम गंभीर ङो. रुट गो. ब्रॉड क्4, चेतेश्वर पुजारा ङो. जॉर्डन गो. ब्रॉड क्क्, विराट कोहली ङो. कुक गो. अॅण्डरसन क्क्, अजिंक्य रहाणो ङो. बेल गो. जॉर्डन 24, महेंद्रसिंग धोनी ङो. जॉर्डन गो. ब्रॉड 71, रवींद्र जडेजा पायचित गो. अॅण्डरसन क्क्, रवीचंद्रन अश्विन ङो. रॉबसन गो. ब्रॉड 4क्, भुवनेश्वर कुमार त्रि. गो. ब्रॉड क्क्, वरुण अॅरोन नाबाद क्1, पंकज सिंग त्रि. गो. ब्रॉड क्क्. अवांतर ( 12). एकूण 46.4 षटकांत सर्व बाद 152. बाद क्रम : 1-8, 2-8, 3-8, 4-8, 5-62, 6-63, 7-129, 8-137, 9-152, 1क्-152. गोलंदाजी : जेम्स अॅण्डरसन 14-3-46-3, स्टुअर्ट ब्रॉड 13.4-6-25-6, ािस व्होक्स 1क्-1-43-क्, ािस जॉर्डन 9-4-27-1.
 

Web Title: Indian batting 'flop show'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.