भारतीय वंशाच्या डॉक्टरने लावला नव्या बॅटचा शोध

By admin | Published: May 19, 2017 02:48 AM2017-05-19T02:48:51+5:302017-05-19T02:48:51+5:30

ब्रिटनस्थित भारतीय वंशाचे आॅर्थोपीडिक सर्जन चिन्मय गुप्ते यांनी बॅटच्या नव्या डिझाईनचा शोध लावला आहे. या वर्षी १ आॅक्टोबरपासून या बॅटचा वापर केला जाईल.

Indian-born doctor invented new bat | भारतीय वंशाच्या डॉक्टरने लावला नव्या बॅटचा शोध

भारतीय वंशाच्या डॉक्टरने लावला नव्या बॅटचा शोध

Next

लंडन : ब्रिटनस्थित भारतीय वंशाचे आॅर्थोपीडिक सर्जन चिन्मय गुप्ते यांनी बॅटच्या नव्या डिझाईनचा शोध लावला आहे. या वर्षी १ आॅक्टोबरपासून या बॅटचा वापर केला जाईल.
क्रिकेट बॅटवर संशोधन करणाऱ्या लंडनच्या इम्पेरियल कॉलेजच्या चमूचे नेतृत्व चिन्मय गुप्ते यांनी केले. मेरिलबोन क्रिकेट क्लब या नव्या डिझाईनच्या बॅटचा वापर करणार आहे.
गुप्ते यांनी सांगितले की, ‘‘ गेल्या ३० वर्षांत क्रिकेटमध्ये षटकारांची संख्या वाढली आहे. बॅटचा आकार असा आहे, की बॉलऐवजी बॅटचा दबदबा राहील. हे नवीन डिझाईन संतुलन आणेल.’’
नवीन नियमानुसार बॅटच्या कोपऱ्यांची जाडी ४० मिलिमीटर तर मध्यभागाची जाडी ६७ मिलिमीटरपेक्षा जास्त नको. गुप्ते हे महाराष्ट्राचे क्रिकेटपटू मधुकर शंकर गुप्ते यांचे पुत्र आहे. तसेच ते मिडलसेक्स आणि ग्लुसेस्टरसाठीदेखील खेळले आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: Indian-born doctor invented new bat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.