भारतीय गोलंदाजांना कळली यॉर्करची ताकद

By admin | Published: May 11, 2017 12:45 AM2017-05-11T00:45:04+5:302017-05-11T00:47:03+5:30

केकेआर विरुद्ध विजयानंतर किंग्ज इलेव्हन पंजाब संघात कमालीचा उत्साह संचारला. या उत्साहाच्या बळावर ते मुंबई इंडियन्सला धक्का देण्याचा प्रयत्न करतील

Indian bowlers know the strength of the yorker | भारतीय गोलंदाजांना कळली यॉर्करची ताकद

भारतीय गोलंदाजांना कळली यॉर्करची ताकद

Next

सुनील गावसकर लिहितात...
केकेआर विरुद्ध विजयानंतर किंग्ज इलेव्हन पंजाब संघात कमालीचा उत्साह संचारला. या उत्साहाच्या बळावर ते मुंबई इंडियन्सला धक्का देण्याचा प्रयत्न करतील. मागच्या सामन्यात पराभूत झालेल्या मुंबईसाठी विजयी पथावर परतणे आणि साखळीत नंबर वन स्थान टिकविणे सोपे नाही. आघाडीच्या दोन संघांना अंतिम फेरीत पात्रता सिद्ध करण्यास एक अतिरिक्त सामना मिळतो.
केकेआर विरुद्ध किंग्स पंजाबचा मारा मोक्याच्या क्षणी महत्त्वपूर्ण ठरला. या विजयात राहुल तेवटिया याचा महत्त्वपूर्ण वाटा राहिला. त्याने दोन फलंदाजांना बाद केले शिवाय निर्णायक टप्प्यात धावादेखील काढल्या. लेगस्पिनर असलेल्या राहुलने मंद गोलंदाजी करताच त्याचे चेंडू उंच मारण्याची संधी फलंदाजांना मिळाली नाही. संदीप शर्मा आणि मोहित शर्मा यांनी देखील अखेरच्या टप्प्यात टिच्चून मारा केला. या दोघांचेही ‘यॉर्कर’ चकित करणारे होते. चेंडूचा वेग मंद असल्याने फलंदाजांना खेळताना कठीण स्थितीस सामोरे जावे लागले. आयपीएलच्या दहाव्या सत्रात भारतीय गोलंदाजांचे यॉर्कर प्रेक्षणीय ठरले. त्यांनी केवळ गोलंदाजी केली नाही तर फलंदाजांना अक्षरश: बांधून ठेवले. भुवनेश्वर कुमारने मनसोक्त मारा केला, तर उमेश यादवने यॉर्करचा अलगद लाभ उचलला. शर्मा बंधू आणि बासिल थम्पी यांनी फलंदाजांवर वर्चस्व गाजवित यॉर्करचे महत्त्व जाणले. या मालिकेत जसप्रीत बुमराहचा तो सुपरओव्हर विसरणे शक्य नाही. या युवा गोलंदाजाने पहिलाच चेंडू वेगवान यॉर्कर टाकला होता. पुढचा चेंडू मंद असल्याने आक्रमक फलंदाजाला धावा काढणे फारच कठीण गेले होते. रोहितला सूर गवसणे ही मुंबईसाठी गोड बातमी आहे. मुंबईसाठी तो ‘गेम चेंजर’ आणि ‘सर्वोत्कृष्ट फिनिशर’ असल्याची जाणीव सर्वांना आहेच. मुंबईची फलंदाजी जबर आहेच शिवाय त्यांच्या गोलंदाजीवर धावा काढणे सोपे नाही. या संघात सलामीवीर नात्याने लेंडल सिमन्सने चांगले योगदान दिले. किंग्स इलेव्हनला सामना जिंकण्यासाठी क्षेत्ररक्षण सुधारावे लागेल. केकेआर विरुद्ध त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी काही शानदार झेल टिपले होते. पण मैदानी क्षेत्ररक्षणात मागील काही सामन्यात त्यांच्या खेळाडूंनी भरपूर अतिरिक्त धावा दिल्या आहेत. मुंबईविरुद्धचा सामना पंजाबसाठी‘ करा किंवा मरा’ असाच असल्याने क्षेत्ररक्षण निर्णायक ठरणार आहे. केकेआरविरुद्ध पंजाबने रोमहर्षकता वाढविल्याने मुंबईला नक्कीच घाम फुटला असावा. (पीएमजी)

Web Title: Indian bowlers know the strength of the yorker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.