भारतीय बॉक्सिंग महासंघ मान्यताप्राप्त संस्था : एआयबीए
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:29 AM2017-10-26T00:29:52+5:302017-10-26T00:30:00+5:30
नवी दिल्ली : भारतीय बॉक्सिंग महासंघ(बीएफआय)हीच आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्था असून, निलंबित करण्यात आलेल्या भारतीय अॅमेच्युअर बॉक्सिंग महासंघाला भारतीय आॅलिम्पिक संघटनेने(आयओए)पुन्हा मान्यता देण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा एआयबीएने दिला आहे.

एआयबीएचे अंतरिम अध्यक्ष फ्रान्को फॉलसिनेली यांनी आयओए अध्यक्ष एन. रामचंद्रन यांना लिहिलेल्या पत्रात बीएफआय भारतात एकमेव मान्यताप्राप्त बॉक्सिंग संघटना असून, अन्य कुण्याही संस्थेला आम्ही अधिकृत मान्यता दिली नसल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे रामचंद्रन यांनी आयओए सचिव राजीव मेहता यांना लिहिलेल्या पत्रात मान्यता काढून घेण्यात आलेली आयएबीएफ आयओएची मान्यताप्राप्त संस्था असल्याचे स्पष्ट केले. एआयबीएने आयएबीएफला २०१४ मध्ये निलंबित केले; पाठोपाठ क्रीडा मंत्रालयानेदेखील मान्यता रद्द केली होती.