भारतीय बॉक्सिंगला कोणाची तरी नजर लागली

By admin | Published: July 21, 2016 09:08 PM2016-07-21T21:08:33+5:302016-07-21T21:08:33+5:30

गेल्या चार वर्षांपासून भारतीय बॉक्सिंगमध्ये संघटनेच्या वादावरुन तणावाचे वातावरण आहे. याचा परिणाम म्हणजे आॅलिम्पिकला जाणाऱ्या भारताच्या तिन्ही बॉक्सर्सवर वेगळेच

The Indian boxing looked like someone | भारतीय बॉक्सिंगला कोणाची तरी नजर लागली

भारतीय बॉक्सिंगला कोणाची तरी नजर लागली

Next

गुलबक्श सिंग संधू : आॅलिम्पिकमध्ये असणार दडपण
नवी दिल्ली : गेल्या चार वर्षांपासून भारतीय बॉक्सिंगमध्ये संघटनेच्या वादावरुन तणावाचे वातावरण आहे. याचा परिणाम म्हणजे आॅलिम्पिकला जाणाऱ्या भारताच्या तिन्ही बॉक्सर्सवर वेगळेच दडपण असेल. जणू काही भारताच्या बॉक्सिंगला कोणाची तरी नजर लागली आहे,ह्णह्ण अशी खंत राष्ट्रीय प्रशिक्षक गुरबक्श सिंग संधू यांनी व्यक्त केली.
शेफील्ड येथून सराव शिबिर दौऱ्यावरुन परतल्यानंतर संधू यांनी आपली प्रतिक्रीया दिली. ह्यह्यसंघटनेच्या वादंगावरुन उठलेल्या गदारोळामुळे आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेले तिन्ही बॉक्सर्स शिवा थापा (५६ किलो), मनोज कुमार (६४) आणि विकास कृष्णन (७५) यांना आपल्या दोन दशकाहून अधिक कारकिर्दीत अनुभवला नसेल इतक्या मोठ्या दबावाला सामोरे जावे लागेल. मी चांगला आणि वाईट असे दोन्ही काळ पाहिले आहेत. मात्र सध्या मोठ्या काळापासून कोणतीही संघटना आमच्यासाठी नसून आमची देखभाल करणारे कोणीही नाही. त्यामुळेच दबाव जास्त असेल,ह्णह्ण असे संधू यावेळी म्हणाले.
ह्यह्यशिवा आणि विकास जागतिक अजिंक्यपद पदक विजेते आहेत, तर मनोजने राष्ट्रकुल चॅम्पियन आहे. आमच्याकडे कोणीही तांत्रिक अधिकारी नसेल. २०१२ नंतर बॉक्सिंगसाठी चित्र बदलले आहे, मात्र तरीही मी सकारात्मक आहे. आता नुकसान झालेच आहे, परंतु भविष्यासाठी सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे.
...........................................

भारतात २०१२ नंतर कोणतीही बॉक्सिंग संघटना अस्तित्वात नाही. अनियमित निवडणूक प्रक्रियेमुळे भारतीय हौशी मुष्टीयोध्दा संघटना बरखास्त करण्यात आली. यानंतर स्थानप झालेली बॉक्सिंग इंडिया संघटना वर्षभरही सुरु स्थिरावू शकली नाही. विविध राज्य संघटनांनी केलेल्या बंडखोरीमुळे ही संघटनाही बरखास्त करण्यात आली. यानंतर आंतरराष्ट्रीय मुष्टीयुध्द संघटेनेद्वारा नियुक्त करण्यात आलेल्या समितीद्वारे भारतात बॉक्सिंगचे संचलन होत आहे. विशेष म्हणजे येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात नव्या राष्ट्रीय संघटनेच्या स्थापनेसाठी निवडणूका होणार आहेत.
..........................................

जागतिक स्तरावरुन राष्ट्रीय संघटनेला निलंबित करण्यात आल्यानंतर खूप काही संपुष्टात आले. जणू काही आपल्या खेळाकडे कोणाची तरी नजर लागली. बीजिंग आॅलिम्पिकमध्ये मिळालेले यश कायम राखण्यात आम्ही यशस्वी ठरलो. आशियामध्ये अव्वल क्रमांक पटकावला, राष्ट्रकुलमध्ये अव्वल राहिलो आणि लंडन आॅलिम्पिकमध्ये आपले ८ बॉक्सर्स पात्र ठरले. यानंतर मात्र संघटना बरखास्त झाल्याने खेळाची स्थिती वाईट झाली.
- गुरबक्श सिंग संधू

Web Title: The Indian boxing looked like someone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.