भारतीय महिला बुद्धिबळ खेळाडूचा बुरखा घालण्यास नकार, एशियन चॅम्पिअनशिपमधून माघार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2018 10:55 AM2018-06-13T10:55:13+5:302018-06-13T10:55:13+5:30
भारताची क्रमांक 5 ची बुद्धिबळपटू सौम्याने फेसबुकवर पोस्ट लिहून यासंदर्भातील माहिती दिली आहे.
पुणे- महिला ग्रॅण्डमास्टर आणि माजी ज्यूनिअर चॅम्पियन सौम्या स्वामीनाथन हिने एशियन चॅम्पिअनशिपमधून माघार घेतली आहे. 26 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान इराणमध्ये होणाऱ्या चॅम्पिअनमध्ये बुरखा किंवा स्कार्फ घालणं बंधनकारक असल्याने तिथे स्पर्धेतून माघार घेतली आहे. इराणमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी बुरखा किंवा स्कार्फ घालणं खासगी अधिकारांचं उल्लघन असल्याचं म्हणतं सौम्याने स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताची क्रमांक 5 ची बुद्धिबळपटू सौम्याने फेसबुकवर पोस्ट लिहून यासंदर्भातील माहिती दिली आहे. 'मला जबरदस्तीने स्कार्फ किंवा बुरखा घालायचा नाही. इराणी कायद्यानुसार जबरदस्तीने बुरखा किंवा स्कार्फ घारणं माझ्या मूलभूत मानवी हक्काचं सगळ उल्लंघन आहे. हे माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्यासह विवेक आणि धर्माचं उल्लंघन आहे. अशा परिस्थितीत मी माझ्या अधिकारांची सुरक्षा करण्यासाठी माझ्याकडे दुसरा कुठलाही रस्ता नसल्याने मी इराणला जाणार नाही', असं तिने फेसुबक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
'राष्ट्रीय संघात निवड झाल्यावर मी जेव्हा भारताचं प्रतिनिधित्व करते तेव्हा ते माझ्यासाठी अभिमानस्पद असतं. इतक्या मोठ्या स्पर्धेत मला सहभागी होण्यास मी असमर्थ ठरल्याचं मला दुःख आहे. एका खेळाडूसाठी खेळ ही गोष्ट त्याच्या आयुष्यात सर्वात पहिले महत्त्वाची ठरते. त्यासाठी अनेक तडतोडी कराव्या लागतात. पण काही गोष्टी अशा असतात ज्यामध्ये तडजोड करता येत नाही, असंही तिने फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.