भारतीय खेळपटया वळण घेणाऱ्या - अनिल कुंबळे

By admin | Published: September 20, 2016 11:42 PM2016-09-20T23:42:22+5:302016-09-20T23:42:22+5:30

ग्रीन पार्कची खेळपट्टी खास कानपुरी शैलीची आहे. ती हमखास वळण घेणारच

Indian cricketer: Anil Kumble | भारतीय खेळपटया वळण घेणाऱ्या - अनिल कुंबळे

भारतीय खेळपटया वळण घेणाऱ्या - अनिल कुंबळे

Next

ऑनलाइन लोकमत
कानपूर, दि. २० : ग्रीन पार्कची खेळपट्टी खास कानपुरी शैलीची आहे. ती हमखास वळण घेणारच. भारतातील सर्वच खेळपट्ट्या वळण घेणाऱ्या असल्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध मालिकेसाठी क्युरेटरला विशेष खेळपट्टी तयार करण्याचे निर्देश दिले नाहीत, असे भारतीय संघाचे कोच अनिल कुंबळे यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

भारतीय संघ कुठल्याही खेळपट्ट्यांवर खेळण्यास सज्ज असल्याचे सांगून ऐतिहासिक ५०० वी कसोटी जिंकण्यासाठी सरसावला आहे, असेही कुंबळे म्हणाले. संघाच्या सरावानंतर पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले, ग्रीनपार्कच्या खेळपट्टीवर मी अनेक सामने खेळलो. या विकेटबद्दल मला आता पुरेशी माहिती आहे. अलीकडे कानपूरमध्ये पाऊस झाला. विकेट चांगली भासत
आहे. जी विकेट मिळेल त्यावर आम्ही आक्रमक खेळू. आमचा संघ विंडीजमध्ये खेळून आल्यामुळे फॉर्ममध्ये आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील सध्याच्या भारतीय संघातील अनेक खेळाडू भारतीय संघाला पाच ते दहा वर्षे अव्वल स्थानावर कायम ठेवण्यास सक्षम आहेत.

न्यूझीलंड संघाचे कौतुक करीत कुंबळे पुढे म्हणाले, न्यूझीलंड संघ चांगलाच आहे. चांगल्या फलंदाजी पाठोपाठ तीन फिरकी गोलंदाज असल्याने गोलंदाजी भक्कम वाटते. आम्ही या संघाचा आदर करतो. भारतीय प्रेक्षकांना उभय संघांमध्ये प्रेक्षणीय लढती पहायला मिळतील, अशी अपेक्षा करू या. आयपीएलमध्ये सहभाग असल्यामुळे न्यूझीलंडच्या खेळाडूंना भारतीय परिस्थिती कळून चुकली. त्यांना कमकुवत मानता येणार नाही. हवामान, माहोल आणि विकेट यांच्याशी न्यूझीलंडचे खेळाडू एकरूप झाल्यास आम्हाला संघर्ष करावा लागू शकतो.

भारतातील फिरकीला पूरक खेळपट्ट्यांविषयी हरभजनसिंग याने नुकतेच वक्तव्य केले होते. त्याविषयी विचारताच कुंबळे म्हणाले, आम्ही कधीही वळण घेणाऱ्या खेळपट्ट्या मागितल्या नाहीत. जशा खेळपट्ट्या मिळतील त्यावर खेळण्याची
आमच्या खेळाडूंची तयारी आहे. फिरकीपटू व वेगवान गोलंदाज प्रत्येक प्रकारच्या खेळपट्टीवर मारा करण्यास सक्षम आहेत. पुढील सहा महिने भरपूर खेळायचे असल्याने आम्ही त्यादृष्टीने तयारी केली आहे.

कोहलीच्या नेतृत्वाचे कौतुक करीत ते म्हणाले, विराट प्रत्येक खेळाडूंवर लक्ष केंद्रित करतो. प्रत्येक सदस्याला समजून घेण्याच्या त्याच्या वृत्तीमुळे टीम इंडिया सध्या चांगली कामगिरी करीत आहे.

Web Title: Indian cricketer: Anil Kumble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.