Kamalpreet Kaur Ban: धक्कादायक! भारताची थाळीफेकपटू कमलप्रीत कौरवर ३ वर्षांची बंदी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 09:08 PM2022-10-12T21:08:09+5:302022-10-12T21:09:46+5:30

कमलप्रीतवरील बंदी २९ मार्च २०२२ पासून लागू

Indian discus thrower Kamalpreet Kaur banned for 3 years by The Athletics Integrity Unit for prohibited substance Stanozolol | Kamalpreet Kaur Ban: धक्कादायक! भारताची थाळीफेकपटू कमलप्रीत कौरवर ३ वर्षांची बंदी!

Kamalpreet Kaur Ban: धक्कादायक! भारताची थाळीफेकपटू कमलप्रीत कौरवर ३ वर्षांची बंदी!

Next

Kamalpreet Kaur Ban: जागतिक अथलेटिक्सच्या Athletics Integrity Unit (AIU) ने ऑलिम्पियन थाळीफेकपटू कमलप्रीत कौरवर तीन वर्षांची बंदी घातली आहे. बुधवारी, एआययूने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की पंजाबमधील २६ वर्षीय खेळाडूवर तिच्या नमुन्यात प्रतिबंधित पदार्थ (स्टेनोझोलॉल) आढळल्याने किंवा तिने तो पदार्थ वापरल्यामुळे तिच्यावर बंदी घालण्यात आली आहे. एआययूने आपल्या एका अहवालात सांगितले होते की, तिचा नमुना यावर्षी ७ मार्च रोजी पटियाला येथे घेण्यात आला होता. त्यानंतर तो चाचणीसाठी पाठवले असता त्यात Stanozolol चे अंश आढळून आले.

कमलप्रीत कौरवरील बंदी २९ मार्च २०२२ पासून लागू होणार आहे. म्हणजेच ती पुढील तीन वर्षे कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार नाही. ७ मार्चनंतर तिने सहभागी झालेल्या कोणत्याही कार्यक्रमाचा निकाल विचारात घेतला जाणार नाही. AIU ने २९ मार्च रोजी तिचे तात्पुरते निलंबन केले होते. तिच्या चाचणीत असे आढळून आले की तिने फेब्रुवारी २०२२ मध्ये प्रोटीन सप्लिमेंटचे दोन स्कूप सेवन केले होते, ज्यामध्ये स्टॅनोझोलॉलचे अंश आढळून आले आहेत.

कमलप्रीत कौरने टोक्यो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तिने पात्रता फेरीत ६४ मीटर लांब थाळीफेक केली होती. ३१ खेळाडूंच्या यादीत ती दुसऱ्या क्रमांकावर होती. अंतिम फेरीत तिला पदकाची अपेक्षा होती, पण तिला तिच्या पात्रता कामगिरीची पुनरावृत्तीही करता आली नाही. तिने ६३.७ मीटरच्या सर्वोत्तम फेकीसह सहावे स्थान पटकावले होते. तिची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ६६.५९ मीटर आहे. तेवढी फेक करण्यात ती ऑलिम्पिकमध्ये यशस्वी झाली असती, तर तिला कांस्यपदक मिळाले असते.

Web Title: Indian discus thrower Kamalpreet Kaur banned for 3 years by The Athletics Integrity Unit for prohibited substance Stanozolol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.