भारतीय हॉकी संघ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत
By admin | Published: October 29, 2016 06:01 PM2016-10-29T18:01:14+5:302016-10-29T18:10:02+5:30
भारताने दक्षिण कोरियाचा ५-४ असा पराभव करुन चौथ्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
कुआंटन, दि. २९ - पेनल्टी शूट आऊटमध्ये रंगलेल्या सामन्यात भारताने दक्षिण कोरियाचा ५-४ असा पराभव करुन चौथ्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. निर्धारित वेळेत दोन्ही संघ २-२ असे गोलबरोबरीत राहिल्याने सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला.
भारताने मिळालेल्या पाचही संधीचे गोलमध्ये रुपांतर केले पण दक्षिण कोरियालाय चारच संधी गोलमध्ये बदलता आल्या. अखेर भारताने एका गोलच्या अंतराने उपांत्यफेरीच्या महत्वाच्या सामन्यात दक्षिण कोरियाला नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला. मलेशिया आणि पाकिस्तानमध्ये उपांत्यफेरीचा दुसरा सामना होणार असून, त्यांच्यातील विजेत्याशी भारताचा सामना होईल.
२०११ मध्ये या स्पर्धेच्या पहिल्या सत्रात जेतेपद पटकावणारा भारतीय संघ पुन्हा एकाद विजेतेपदाचा मान मिळवण्यास उत्सुक आहे. भारताला राऊंड रॉबिन लीगमध्ये दक्षिण कोरियाच्या युवा संघाविरुद्ध १-१ ने बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर मात्र भारतीय संघाची कामगिरी उंचावली आहे. राऊंड रॉबिन लीग फेरीनंतर भारतीय संघ अव्वल स्थानी आहे.