भारतीय हॉकी संघ करणार ऑलिम्पिकची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 05:44 AM2020-01-18T05:44:54+5:302020-01-18T05:45:06+5:30
मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारत राऊंड रॉबिनमधील अखेरचा सामना १३-१४ जून रोजी स्पेनविरुद्ध खळेल. भारताचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांना स्पर्धेतील आव्हानांची जाणीव आहे.
भुवनेश्वर : भारतीय हॉकी संघाला जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या नेदरलँड्सविरुद्ध शनिवार व रविवारी एफआयएच प्रो-लीग लढतीत दोन हात करावे लागतील. या सामन्याद्वारे संघाच्या टोकियो आॅलिम्पिक मोहिमेला प्रारंभ होईल. भारताने मागच्या प्रो-लीगमध्ये भाग घेतला नव्हता. यंदा २०१९ च्या प्रो-लीगचा विजेता आणि युरोपियन कांस्य विजेत्या नेदरलँड्सविरुद्ध भारताची सलामीला गाठ पडत आहे. पहिला सामना शनिवारी आणि दुसरा रविवारी कलिंगा स्टेडियम येथे होईल.
या लीगमध्ये एकमेकांविरुद्धचे सामने ‘होम अॅण्ड अवे’ या आधारे खेळविले जातात. नेदरलँड्सनंतर भारताला ८-९ फेब्रुवारी रोजी विश्वविजेत्या बेल्जियमविरुद्ध, २२-२३ फेब्रुवारीला आॅस्ट्रेलियाविरुद्ध, २५-२६ एप्रिल रोजी जर्मनीविरुद्ध आणि २-३ मे रोजी इंग्लंडविरुद्ध सामने खेळायचे आहेत. मायदेशात परत आल्यानंतर २३-२४ मे रोजी न्यूझीलंडविरुद्ध तसेच ५-६ जून रोजी अर्जेंटिनाविरुद्ध खेळावे लागेल. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारत राऊंड रॉबिनमधील अखेरचा सामना १३-१४ जून रोजी स्पेनविरुद्ध खळेल.
भारताचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांना स्पर्धेतील आव्हानांची जाणीव आहे.