भारतीय ज्युनिअर श्रीलंकेचे आव्हान पेलण्यास सज्ज

By admin | Published: February 9, 2016 03:31 AM2016-02-09T03:31:44+5:302016-02-09T03:31:44+5:30

तीनदा विश्वविजेतेपदाचा मान मिळवणाऱ्या भारतीय संघाला मंगळवारी शेरे बांगला नॅशनल स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या अंडर-१९ क्रिकेट विश्वकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत श्रीलंकेच्या

Indian junior ready to face Sri Lanka | भारतीय ज्युनिअर श्रीलंकेचे आव्हान पेलण्यास सज्ज

भारतीय ज्युनिअर श्रीलंकेचे आव्हान पेलण्यास सज्ज

Next

मीरपूर : तीनदा विश्वविजेतेपदाचा मान मिळवणाऱ्या भारतीय संघाला मंगळवारी शेरे बांगला नॅशनल स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या अंडर-१९ क्रिकेट विश्वकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत श्रीलंकेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. भारतीय संघ कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे.
भारतीय संघ या स्पर्धेत अपराजित आहे. भारताने साखळी फेरीत आयर्लंड, न्यूझीलंड आणि नेपाळचा पराभव केला. त्यानंतर नामिबियाचा १९७ धावांच्या
फरकाने पराभव करीत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. ऋषभ पंत आणि सरफराज खान यांनी या स्पर्धेत आतापर्यंत अनुक्रमे २५२ व २४५ धावा फटकावल्या आहेत. भारतीय संघाचे हे दोन प्रमुख फलंदाज आहेत.
पंतने गेल्या लढतीत ९६ चेंडूंत ११ धावांची खेळी केली होती. पंत उपांत्य फेरीतही कामगिरी सातत्य राखण्यास प्रयत्नशील आहे. सरफराजनेही कामगिरीत सातत्य राखले असून त्याने चार सामन्यांत आतापर्यंत तीन अर्धशतके ठोकली आहेत. अरमान जाफर आणि महिपाल लोमरोर यांनी संघाला गरज असताना योगदान दिले आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघाची भिस्त या खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून राहील. (वृत्तसंस्था)

श्रीलंकेविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल : द्रविड
आयसीसी अंडर-१९ विश्वकप स्पर्धेत मंगळवारी खेळल्या जाणाऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल, अशी प्रतिक्रिया भारताच्या अंडर-१९ संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केली.
न्यूझीलंड, नेपाळ व आयर्लंड संघाचा पराभव करीत भारताने ‘ड’ गटात अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत भारताने नामिबियाचा १९७ धावांनी पराभव केला. ‘ब’ गटातील अखेरच्या साखळी सामन्यात पाकिस्तानविरुद्ध पत्कराव्या लागलेल्या पराभवातून सावरताना श्रीलंकेने उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडचा सहा गडी राखून पराभव केला.

प्रतिस्पर्धी संघ
भारत : ईशान किशन (कर्णधार), खलील अहमद, अमनोलप्रीत सिंग, अरमान जाफर, अवेश खान, राहुल बाथम, रिकी भुई, मयंक डागर, सरफराज खान, अमनदीप खरे, महिपाल लोमरोर, शुभम मावी, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर आणि झिशान अन्सारी.
श्रीलंका : चरिथ असालंका (कर्णधार), शामू अशान, कवीन बंडारा, जेहान डॅनियल, विशाद रंडिका, वानिडू हसारंगा, असिथा फर्नांडो, अविष्का फर्नांडो, लाहिरू कुमारा, कामिंदू मेंडिस, चराणा नानायाकारा, तिलन निमेश, सालिंडू उशान, लाहिरू सुमाराकून आणि दामिथा सिल्वा.

Web Title: Indian junior ready to face Sri Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.