Asian Games साठी भारताचे कबड्डी संघ जाहीर; महाराष्ट्राच्या २ पुरुष व २ महिला खेळाडूंची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 09:39 AM2023-08-26T09:39:38+5:302023-08-26T09:50:22+5:30

Asian Games चीन येथे होणाऱ्या "१९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेकरीता" महाराष्ट्राच्या २ पुरुष व २ महिला खेळाडूंची भारताच्या कबड्डी संघात निवड झाली आहे.

Indian kabaddi teams for Asian Games:  Pardeep Narwal left out, Maharashtra's four players in Men's and Women's team | Asian Games साठी भारताचे कबड्डी संघ जाहीर; महाराष्ट्राच्या २ पुरुष व २ महिला खेळाडूंची निवड

Asian Games साठी भारताचे कबड्डी संघ जाहीर; महाराष्ट्राच्या २ पुरुष व २ महिला खेळाडूंची निवड

googlenewsNext

हँगझोऊ - चीन येथे होणाऱ्या "१९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेकरीता" Asian Games महाराष्ट्राच्या २ पुरुष व २ महिला खेळाडूंची भारताच्याकबड्डी संघात निवड झाली आहे. ठाण्याचा असलम इनामदार व नाशिकच्या आकाश शिंदे यांची भारतीय पुरुष कबड्डी संघात निवड झाली आहे. तर मुंबईची व भारतीय रेल्वेकडून खेळणारी सोनाली शिंगटे आणि पुण्याची स्नेहल शिंदे यांची भारतीय महिला संघात निवड झाली आहे. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत गोल्ड जिंकणारा पुरुष संघच जवळपास कायम आहे, फक्त मोहित गोयतच्या जागी आकाश शिंदे आला असून १२ सदस्यांमधून प्रदीप नरवालला वगळण्यात आले आहे.  


१९९० पासून ते २०१८ पर्यंत भारताने आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे.  बुसान येथे नुकत्याच झालेल्या स्पर्धेत भारताने विजेतेपद मिळविले होते. या संघात महाराष्ट्राचा असलम इनामदार हा एकटाच खेळाडू भारतीय संघात होता. आकाश शिंदे हा भारतीय संघाच्या सराव शिबिरात होता. पण त्याची अंतिम संघात निवड झाली नव्हती. यावेळी मात्र त्याला संधी मिळाली आहे. हे दोन्ही खेळाडू डाव्या बाजूने चढाई करण्यात माहीर आहेत. बोनस करण्यातही त्यांचा हातखंडा आहे. 


या अगोदर देखील महिला भारतीय कबड्डी संघात या दोन महिला खेळाडूंची निवड झाली होती. या दोन्ही चढाईच्या हुकमी खेळाडू आहेत. चारही खेळाडूंच्या निवडीमुळे महाराष्ट्र कबड्डी वर्तुळात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे. सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.चे नवनिर्वाचित सरचिटणीस बाबुराव चांदेरे या निवडीने अत्यंत खुश झाले असून त्यांनी निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. 


भारताचा पुरुष संघ - पवन कुमार शेहरावत, नितेश कुमार, पर्वेश भैनस्वाल, सुनील कुमार, नितीन रावल, सुरजीत सिंग, विशाल भरद्वाज, सचिन तनवरे, अर्जुन देश्वाल, अस्लम इनामदार, आकाश शिंदे आणि नवीन कुमार गोयत ( Indian men's kabaddi team for Asian Games: Pawan Kumar Sehrawat, Nitesh Kumar, Parvesh Bhainswal, Sunil Kumar, Nitin Rawal, Surjeet Singh, Vishal Bharadwaj, Sachin Tanwar, Arjun Deshwal, Aslam Inamdar, Akash Shinde and Naveen Kumar Goyat.)


भारताचा महिला संघ - अक्षिमा, ज्योती, पूजा, पूजा, प्रियांका, पुष्पा, साक्षी कुमारी, रितू नेगी, निशी शर्मा, सुष्मा शर्मा, स्नेहल शिंदे, सोनाली शिंगटे ( Indian women's kabaddi team for Asian Games: Akshima, Jyoti, Pooja, Pooja, Priyanka, Pushpa, Sakshi Kumari, Ritu Negi, Nishi Sharma, Sushma Sharma, Snehal Shinde and Sonali Shingate.)

Web Title: Indian kabaddi teams for Asian Games:  Pardeep Narwal left out, Maharashtra's four players in Men's and Women's team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.