‘भारतीय’ नेतृत्वाची ‘कसोटी’

By admin | Published: May 7, 2016 04:46 AM2016-05-07T04:46:34+5:302016-05-07T04:46:34+5:30

आयपीएलच्या नवव्या पर्वात खराब कामगिरीमुळे त्रस्त असलेल्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुमहेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील रायझिंग पुणे सुपरजायंटस्विरुद्ध

'Indian' leadership 'Test' | ‘भारतीय’ नेतृत्वाची ‘कसोटी’

‘भारतीय’ नेतृत्वाची ‘कसोटी’

Next

बंगलोर : आयपीएलच्या नवव्या पर्वात खराब कामगिरीमुळे त्रस्त असलेल्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुमहेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील रायझिंग पुणे सुपरजायंटस्विरुद्ध आज, शनिवारी एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर ‘दोन हात’ करणार आहे. हा सामना धोनी- विराटच्या नेतृत्वगुणांची ‘परीक्षा’ मानला जात आहे.
उभय संघात चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे, पण दोन्ही संघ कामगिरीत फ्लॉप ठरले. पुण्याने दिल्लीला नमवित विजयी पथावर येण्याचे संकेत दिले खरे, पण संघाचा नऊ सामन्यांत हा जेमतेम तिसराच विजय होता. बेंगळुरूनेसातपैकी केवळ दोन सामने जिंकल्याने सातव्या स्थानावर घसरला. दोन्ही संघांना विजयाशिवाय पर्याय नाही. कारण आणखी एक पराभव म्हणजे स्पर्धेबाहेर होणे असे समीकरण तयार आहे. स्टीव्हन स्मिथ, फाफ डुप्लेसिस, केव्हिन पीटरसन, मिशेल मार्श हे सर्वजण जखमी होऊन बाहेर पडले. अंतिम ११ खेळाडू निवडताना धोनीची दमछाक होत आहे. अजिंक्य रहाणे, सौरभ तिवारी, तिसारा परेरा, अशोक डिंडा हे मात्र कामगिरीत सातत्य राखून आहेत. यांच्याच कामगिरीमुळे संघाची इभ्रत शाबूत राहिली. रहाणे आणि उस्मान ख्वाजा यांनी दमदार फलंदाजी केली, तर रजत भाटियाने टिच्चून मारा केला. धोनीदेखील मधल्या फळीत योगदान देण्याचे प्रयत्न करीत आहे. अश्विन मात्र गोलंदाजीत अद्याप चमकताना दिसत नाही. पुण्याकडे चुका सुधारण्याची संधीही आता उरली नसल्याने गोलंदाजांना धावा रोखण्याचे मोठे आव्हान असेल.
बेंगळुरु मागच्या सामन्यात कोलकाताकडून पाच धावांनी पराभूत झाला. स्पर्धेत सर्वांत चांगले गोलंदाज बेंगळुरुकडेच असूनही हा संघ धावा काढल्यानंतरही धावांचा बचाव करण्यात अपयशीच ठरतो. संघाच्या पराभवात खराब क्षेत्ररक्षण आणि कमकुवत गोलंदाजी कारणीभूत ठरली. केकेआरविरुद्ध तबरेज शम्सीने चार षटकांत तब्बल ५१ धावा मोजून प्रतिस्पर्धी संघाला विजय दान केला. यजुवेंद्र चहल आणि शेन वॉटसन हे धावा रोखून गडी बाद करतात, पण दुसऱ्या टोकाहून त्यांना साथ मिळत नसल्याने पराभवाची निराशा पदरी पडत आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: 'Indian' leadership 'Test'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.