भारतीय पुुरुष संघ विजेता

By admin | Published: April 7, 2016 02:06 AM2016-04-07T02:06:12+5:302016-04-07T02:06:12+5:30

भारताच्या पुरुषांच्या संघाने व्हिएतनामला ३-१ असे पराभूत करीत आशियाई बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावले. बलाढ्य चीनला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले

Indian male warrior winner | भारतीय पुुरुष संघ विजेता

भारतीय पुुरुष संघ विजेता

Next

इपोह : भारताच्या पुरुषांच्या संघाने व्हिएतनामला ३-१ असे पराभूत करीत आशियाई बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावले. बलाढ्य चीनला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेत भारताने १७ गुण मिळवले, तर चीनला १५ गुण मिळाले. अग्रमानांकित चीनने युएईला ४-० असे पराभूत केले. कजागिस्तान व इराणने अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक पटकावला. ही स्पर्धा २२ संघांदरम्यान नऊ राउंडमध्ये झाली.
भारताने फक्त मंगोलियाबरोबरचा सामना बरोबरीत सोडवला; तर अन्य सर्व संघांना पराभूत केले. अंतिम फेरीतील सामन्यात व्हिएतनाम विरुद्ध ग्रॅँडमास्टर सेतुरमन व शशिकिरण यांनी विजय मिळवला; तर ग्रॅँडमास्टर बी अधिबान व विदित संतोष यांनी आपला सामना बरोबरीत सोडविला. भारताने तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. यापूर्वी २००५ व २००९ मध्ये भारताने जेतेपद पटकावले होते. या दोन्ही वेळा चीनने स्पर्धेत सहभाग घेतला नव्हता.

Web Title: Indian male warrior winner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.