भारतीय पुरुष संघ जर्मनीला रवाना
By admin | Published: May 29, 2017 07:23 PM2017-05-29T19:23:26+5:302017-05-29T19:23:26+5:30
भारतीय पुरुष हॉकी संघ तीन देशांच्या निमंत्रित स्पर्धेसाठी रविवारी जर्मनीला रवाना झाला. पुढील महिन्यात होणा-या हॉकी विश्व लीग उपांत्य फेरीत सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचे लक्ष्य डोळ्यापुढे ठेवून
Next
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि.29 - भारतीय पुरुष हॉकी संघ तीन देशांच्या निमंत्रित स्पर्धेसाठी रविवारी जर्मनीला रवाना झाला. पुढील महिन्यात होणा-या हॉकी विश्व लीग उपांत्य फेरीत सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचे लक्ष्य डोळ्यापुढे ठेवून मनप्रितसिंहच्या नेतृत्वाखाली १८ खेळाडूंचा भारतीय संघ जर्मनी व बेल्जियमविरुद्ध दोन-दोन सामने खेळेल. हॉकी विश्व लीगसाठी संघ ९ जून रोजी लंडनला पोहोचेल. तेथे आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या अर्जेंटिना आणि ग्रेट ब्रिटनविरुद्ध सराव सामने खेळेल.
डसेलडोर्फ येथे १ जूनपासून सुरू होणा-या या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाचे दोन आठवड्यांचे प्रशिक्षण शिबिर बंगळुरु येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मैदानावर पूर्ण झाले. जर्मनीला रवाना होण्यापूर्वी मनप्रितसिंहने वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘आम्ही सराव सामन्यांकडे नेहमी गंभीरतेने पाहतो. कारण या सामन्यांमुळे आगामी स्पर्धेसाठी खेळाडूंना लय गवसते. लीगमध्ये आम्ही कोणत्याही संघाला कमजोर समजणार नाही. आमचे लक्ष्य विजय नोंदवून तीन गुण संपादन करण्याचे असेल.
---------------------------
भारतीय संघाचे सामने :
१५ जून : स्कॉटलंड, १७ जून : कॅनडा; १८ जून : पाकिस्तान, २० जून : नेदरलॅँड्स.
---------------
जर्मनी व बेल्जियम हे दोन्ही संघ रिओ आॅलिम्पिकमधील पदकविजेते संघ आहेत. अशा आघाडीच्या संघांविरुद्ध खेळल्याने हॉकी विश्व लीग उपांत्य फेरीत खेळताना आम्हाला नक्कीच मदत मिळेल. तसेच, आमचा आत्मविश्वाससुद्धा वाढेल. शिवाय आम्हाला चुका सुधारण्याची संधीही मिळेल. ही स्पर्धा खेळताना आम्हाला कोणती रणनीती आखावी, याचासुद्धा अभ्यास करता येणार आहे. या दोन्ही संघांविरुद्ध आम्ही चांगल्या कामगिरीचा प्रयत्न करू. त्यामुळे लंडन येथे होणा-या लीगचे आव्हान स्वीकारण्यासाठी आम्ही सज्ज असू.
- मनप्रितसिंह, कर्णधार