Sudhir Wins Gold Medal: सुधीरनं पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये 'सुवर्ण' कामगिरी करत रचला इतिहास, भारताला मिळालं सहावं गोल्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 08:15 AM2022-08-05T08:15:59+5:302022-08-05T08:16:23+5:30
Sudhir Wins Gold in Commonwealth Games 2022: सुधीरने पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. आता राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात एकूण ६ सुवर्णपदके आहेत.
Sudhir Wins Gold in Commonwealth Games 2022: पॅरा पॉवरलिफ्टर सुधीरने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास रचला. त्याने सुवर्णपदक जिंकून भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्ण पदक आणलं आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात आता एकूण ६ सुवर्णपदके आहेत. सुधीरने २१२ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत भारताने प्रथमच सुवर्णपदक जिंकले आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेच्या पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा सुधीर हा पहिला भारतीय खेळाडू आहे. त्याने दुसऱ्या प्रयत्नात १३४.५ च्या विक्रमी गुणांसह २१२ किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. सुधीरला मात्र शेवटच्या प्रयत्नात २१७ किलो वजन उचलण्यात अपयश आले.
India's Sudhir wins 1st ever gold medal in Para Powerlifting at #CommonwealthGames. pic.twitter.com/mspPzzIoSw
— ANI (@ANI) August 4, 2022
नायजेरियाच्या इकेचूकवू क्रिस्टियन उबिचुकवुनं १३३.६ गुण मिळवत रौप्य पदक पटकावलं. तर स्कॉटलंडच्या मिकी युलेनं १३०.९ गुणांसह कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं. इकेचूकवू क्रिस्टियन उबिचुकवुनं १९७ किलो आणि युलेनं १९२ किलो वजन उचललं. सुधीरच्या या विजयासह भारताची सहा सुवर्णपदके झाली असून पदकतालिकेत भारत सातव्या स्थानावर पोहोचला आहे.