CWG 2022:एकाच दिवसात भारताच्या खात्यात १४ पदकं; जाणून घ्या भारताच्या एकूण पदकांची संख्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 01:18 PM2022-08-07T13:18:39+5:302022-08-07T13:19:38+5:30

इंग्लंडमधील बर्गिंहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उल्लेखणीय कामगिरी केली आहे.

Indian players Commonwealth games 2022, a total of 40 medals have been won |  CWG 2022:एकाच दिवसात भारताच्या खात्यात १४ पदकं; जाणून घ्या भारताच्या एकूण पदकांची संख्या 

 CWG 2022:एकाच दिवसात भारताच्या खात्यात १४ पदकं; जाणून घ्या भारताच्या एकूण पदकांची संख्या 

googlenewsNext

बर्गिंहॅम : इंग्लंडमधील बर्गिंहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल (Commonwealth Games 2022) स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उल्लेखणीय कामगिरी केली आहे. स्पर्धेच्या नवव्या दिवशी म्हणजेच शनिवारी भारताने तब्बल १४ पदकांवर आपले नाव कोरले, यामध्ये ४ सुवर्ण, ३ रौप्य आणि ७ कांस्य पदकांचा समावेश होता. एवढेच नाही तर भारताच्या महिला क्रिकेट संघाने उपांत्यफेरीत यजमान इंग्लंडचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तसेच टेबल टेनिस, बॉक्सिंग आणि हॉकी यांसारख्या खेळांमध्ये देखील भारताने पदकाकडे कूच केली आहे.

कुस्तीत ६ सुवर्ण
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या १२च्या १२ मल्लांनी पदकांची कमाई करून इतिहास घडविला. बर्मिंगहॅम येथे झालेल्या या स्पर्धेत दोन दिवसांत भारतीय मल्लांनी १२ पदकं जिंकली. त्यात सर्वाधिक ६ सुवर्ण, १ रौप्य व ५ कांस्यपदकांची कमाई होती. एकाच राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने कुस्तीत प्रथमच ६ सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. यापूर्वी भारताने २०१८मध्ये ५ सुवर्ण, ३ रौप्य व ४ कांस्यपद जिंकली होती.

भारतीय हॉकी संघाने गाठली अंतिम फेरी
भारतीय हॉकी संघाने चुरशीच्या अंतिम सामन्यात भारताने ३-२ अशा फरकाने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. पुरूष संघाला २०१० व २०१४च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकता आले होते आणि आता त्यांना पहिले सुवर्णपदक जिंकण्याची संधी पुन्हा चालून आली आहे. 

राष्ट्रकुल स्पर्धेत आतापर्यंत पदक विजेते भारतीय खेळाडू

  1. संकेत महादेव - रौप्य पदक (वेटलिफ्टिंग ५५ किलो)
  2. गुरूराजा पुजारी - कांस्य पदक (वेटलिफ्टिंग ६१ किलो)
  3. मीराबाई चानू - सुवर्ण पदक (वेटलिफ्टिंग ४९ किलो)
  4. बिंद्यारानी देवी - रौप्य पदक (वेटलिफ्टिंग ५५ किलो)
  5. जेरेमी लालरिनुंगा - सुवर्ण पदक (वेटलिफ्टिंग ६७ किलो)
  6. अचिंता शेऊली - सुवर्ण पदक (वेटलिफ्टिंग ७३ किलो)
  7. सुशीला देवी - रौप्य पदक (ज्युडो ४८ किलो)
  8. विजय कुमार यादव - कांस्य पदक (ज्युडो ६० किलो)
  9. हरजिंदर कौर - कांस्य पदक (वेटलिफ्टिंग ७१ किलो)
  10. महिला संघ - सुवर्ण पदक (लॉन बॉल्स)
  11. पुरूष संघ - सुवर्ण पदक (टेबल टेनिस)
  12. विकास ठाकूर - रौप्य पदक (वेटलिफ्टिंग ९६ किलो)
  13. मिश्र बॅडमिंटन संघ - रौप्य पदक 
  14. लवप्रीत सिंग - कांस्य पदक (वेटलिफ्टिंग १०९ किलो) 
  15. सौरव घोषाल - कांस्य पदक (स्क्वॉश)
  16. तुलिका मान - रौप्य पदक (ज्युडो)
  17. गुरदीप सिंग - कांस्य पदक (वेटलिफ्टिंग १०९ + किलो)
  18. तेजस्विन शंकर - कांस्य पदक (उंच उडी)  
  19. मुरली श्रीशंकर  - रौप्य पदक (लांब उडी)
  20. सुधीर - सुवर्ण पदक (पॅरा पॉवरलिफ्टिंग)
  21. अंशु मलिक - रौप्य पदक (कुस्ती ५७ किलो)
  22. बजरंग पुनिया - सुवर्ण पदक (कुस्ती ६५ किलो)
  23. साक्षी मलिक - सुवर्ण पदक (कुस्ती ६२ किलो)
  24. दीपक पुनिया - सुवर्ण पदक (कुस्ती ८६ किलो)
  25. दिव्या काकरान - कांस्य पदक (कुस्ती ६८ किलो)
  26. मोहित ग्रेव्हाल - कांस्य पदक (कुस्ती १२५ किलो)
  27. प्रियंका गोस्वामी - रौप्य पदक (१० किमी चालणे)
  28. अविनाश साबळे - रौप्य पदक (स्टीपलचेज) 
  29. पुरूष संघ - रौप्य पदक (लॉन बॉल)
  30. जॅस्मीन लॅंबोरिया - कांस्य पदक (बॉक्सिंग)
  31. पूजा गहलोत - कांस्य पदक (कुस्ती ५० किलो)
  32. रवि कुमार दहिया - सुवर्ण पदक (कुस्ती ५३ किलो)
  33. विनेश फोगाट - सुवर्ण पदक (कुस्ती ५३ किलो)
  34. नवीन - सुवर्ण पदक (कुस्ती ७४ किलो)
  35. पूजा सिहाग - कांस्य पदक (कुस्ती)
  36. मोहम्मद हुसामुद्दीन - कांस्य पदक (बॉक्सिंग)
  37. दीपक नेहरा - कांस्य पदक (कुस्ती ९७ किलो)
  38. सोनलबेन पटेल - कांस्य पदक (पॅरा टेबल टेनिस)
  39. रोहित टोकस - कांस्य पदक (बॉक्सिंग)
  40. भाविना पटेल - सुवर्ण पदक (पॅरा टेबल टेनिस)

Web Title: Indian players Commonwealth games 2022, a total of 40 medals have been won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.