भारतीय खेळाडूंची जिगरबाज कामगिरी

By admin | Published: July 17, 2016 08:49 PM2016-07-17T20:49:37+5:302016-07-17T20:49:37+5:30

येथे सुरू असलेल्या जागतिक शालेय क्रीडा स्पर्धेत भारतीय शालेय क्रीडापटूंनी आपापल्या क्रीडा प्रकारांत १० सुवर्ण, १८ रौप्य व २५ कांस्य, असे एकूण ५३ पदके जिंकली आहेत

Indian players' jagabhar performance | भारतीय खेळाडूंची जिगरबाज कामगिरी

भारतीय खेळाडूंची जिगरबाज कामगिरी

Next

जागतिक शालेय क्रीडा स्पर्धा : ५३ पदकांसह तिसऱ्या क्रमांकावर
पुणे : ट्रॅपझोन (तुर्कस्तान) येथे सुरू असलेल्या जागतिक शालेय क्रीडा स्पर्धेत भारतीय शालेय क्रीडापटूंनी आपापल्या क्रीडा प्रकारांत १० सुवर्ण, १८ रौप्य व २५ कांस्य, असे एकूण ५३ पदके जिंकली आहेत. पदक तालिकेत भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे.
तुर्कस्तानमध्ये झालेल्या लष्करी उठावाने निर्माण झालेल्या दहशतीच्या वातावरणाचे कोणतेही दडपण न घेता भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. मुलींच्या गटात सिद्धी हिरे, संगीता शिंदे, रोजलिन लुईस व सेमश्री या चौघींनी २००-४००-६००-८०० मीटर मिडले रिलेमध्ये रविवारी रौप्यपदक जिंकले.

Web Title: Indian players' jagabhar performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.