पंतप्रधान मोदींची 'जनता कर्फ्यू'ची साद; विराट, शास्त्री, भज्जी, साक्षीने 'असा' दिला प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 09:28 IST2020-03-20T05:22:07+5:302020-03-20T09:28:45+5:30

कोरोना विषाणूविरुद्ध लढा देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असा संदेश भारतीय खेळाडूंनी सोशल मीडियावरुन देशवासीयांना दिला.

Indian players support 'Janata curfew', call for fight against Corona virus | पंतप्रधान मोदींची 'जनता कर्फ्यू'ची साद; विराट, शास्त्री, भज्जी, साक्षीने 'असा' दिला प्रतिसाद

पंतप्रधान मोदींची 'जनता कर्फ्यू'ची साद; विराट, शास्त्री, भज्जी, साक्षीने 'असा' दिला प्रतिसाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कोरोना विषाणूविरुद्ध लढा देण्यासाठी रविवारी ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्याचे आवाहन केल्यानंतर भारतीय खेळाडूंनीही या निर्णयास पाठिंबा दिला. कोरोना विषाणूविरुद्ध लढा देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असा संदेश भारतीय खेळाडूंनी सोशल मीडियावरुन देशवासीयांना दिला.
याविषयी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने ट्वीट केले की, ‘कोरोनाच्या धोक्यापासून वाचण्यासाठी सतर्क रहा, जागरुक रहा. जाबबादार नागरिक म्हणून आपण सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याची आवश्यकता आहे.’

फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने म्हटले की, ‘मान्य करा किंवा नको, पण एक अरब लोकसंख्येच्या आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे म्हणणे ऐकण्याची गरज आहे.’

याशिवाय हरभजन सिंग, कुस्तीपटू योगेश्वर दत्त, विनेश फोगाट, साक्षी मलिक, हॉकीपटू राणी रामपाल यांनीही जनता कर्फ्यूला समर्थन दिले.



भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटले की, ‘चला, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आपण २२ मार्चला सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू लावू. एक देश म्हणून आपल्याला संयम दाखविण्याची गरज आहे.’ त्याचप्रमाणे, सलामीवीर शिखर धवनने सांगितले की, ‘आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्चला जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. तुम्ही सर्वजण सुरक्षित रहा आणि काळजी घ्या.’

Web Title: Indian players support 'Janata curfew', call for fight against Corona virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.