भारतीय नेमबाज सौरभ चौधरीला सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 08:29 AM2022-03-02T08:29:52+5:302022-03-02T08:30:24+5:30

भारताचा स्टार नेमबाज सौरभ चौधरीने आयएसएसएफ विश्वचषकात पुरुषांच्या दहा मीटर एयर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे.

indian shooter saurabh chaudhary wins gold | भारतीय नेमबाज सौरभ चौधरीला सुवर्णपदक

भारतीय नेमबाज सौरभ चौधरीला सुवर्णपदक

Next

काहिरा : भारताचा स्टार नेमबाज सौरभ चौधरीने आयएसएसएफ विश्वचषकात पुरुषांच्या दहा मीटर एयर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. आशियाई सुवर्णपदक विजेत्या भारताच्या या खेळाडूने जर्मनीच्या मायकल श्वाल्डला पराभूत करत सुवर्णपदकाची कमाई केली, तर रशियाचा अर्टेन चेरनोसोवला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे या स्पर्धेतून रशियाचा राष्ट्रध्वज हटविण्यात आला होता. तत्पूर्वी या स्पर्धेच्या पात्रता फेरीत सौरभ चौधरीने ५८४ गुणांची कमाई करत तिसरे स्थान गाठले होते. अंतिम फेरीत त्याने ४२.५ गुण मिळवत सुवर्णपदक आपल्या नावे केेले. महिलांच्या १० मीटर एयर पिस्टल प्रकारात भारताच्या ईशा सिंग, रुचिता विनेरकर आणि श्री निवेता हे आपले आव्हान पेश करणार आहे.
 

Web Title: indian shooter saurabh chaudhary wins gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.