भारतीय नेमबाजांना विमानतळावर रोखले

By admin | Published: May 10, 2017 12:56 AM2017-05-10T00:56:01+5:302017-05-10T00:56:01+5:30

बंदुकांना परवानगी नाकारल्यामुळे तासन्तास विमानतळावर ताटकळणाऱ्या नेमबाजांना कुठलीही मदत न करणाऱ्या भारतीय राष्ट्रीय

Indian shooters stopped the airport | भारतीय नेमबाजांना विमानतळावर रोखले

भारतीय नेमबाजांना विमानतळावर रोखले

Next

नवी दिल्ली : बंदुकांना परवानगी नाकारल्यामुळे तासन्तास विमानतळावर ताटकळणाऱ्या नेमबाजांना कुठलीही मदत न करणाऱ्या भारतीय राष्ट्रीय रायफल संघाच्या(एनआरएआय) पदाधिकाऱ्यांना आॅलिम्पिक सुवर्ण विजेता अभिनव बिंद्रा याने चांगलेच धारेवर धरले. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा प्रकार घडला.
बिंद्राने टिष्ट्वटरवर लिहिले, ‘राष्ट्रीय नेमबाज आयजीआय विमानतळावर अडकले. सीमाशुल्क विभागाने त्यांच्या बंदुकांना मंजुरी प्रदान करण्यास नकार दिला. संघाच्या व्यवस्थापकाने कुठलाही पुढाकार न घेता खेळाडूंनी स्वत: प्रकरण हाताळावे असे सांगून टाकले होते. यापैकी काही खेळाडूंशी मी संवाद साधला. त्यांनी एनआरएआयकडून कुठलेही सहकार्य मिळाले नसल्याची माहिती दिली तेव्हा वाईट वाटले. खेळाडू आमच्या देशाचे दूत असल्याने त्यांच्यासोबत असा व्यवहार होणे अपेक्षित नव्हते. आमच्या क्रिकेट संघासोबत असा प्रकार कधी घडला आहे का, असा सवाल अभिनवने एनआरएआयचे अध्यक्ष रानिदरसिंग यांना उद्देशून केला. सायप्रस येथील विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सहभागी होऊन भारतीय नेमबाज मायदेशी परतले होते. घरच्या विमानतळावर त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली. या संघात चैनसिंग, गुरुप्रितसिंग, आणि कयनान चेनाईसारख्या दिग्गज नेमबाजांचा समावेश होता. दहा तांस प्रतीक्षा केल्यानंतरच या खेळाडूंना आपापल्या उपकरणांसह बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली. यावर प्रतिक्रिया देताना नेमबाज हिना सिद्धू म्हणाली,‘नेमबाजांना कुठलेही कारण न देता तसेच त्यांची चूक नसताना आयजीआय विमानतळावर रोखण्यात आले. नेमबाज नेहमी नियमांचे पालन करतात त्याचा परिणाम असा भोगावा लागला आहे. दहा तास खेळाडूंचे असे धिंडवडे काढणे योग्य नव्हे.’ (वृत्तसंस्था)

Web Title: Indian shooters stopped the airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.