PV Sindhu wins Swiss Open 2022: भारताच्या पीव्ही सिंधूने जिंकले स्विस ओपनचे विजेतेपद; थायलंडच्या बुसाननवर वर्चस्व कायम राखलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 09:48 PM2022-03-27T21:48:20+5:302022-03-27T21:49:47+5:30

पंतप्रधान मोदी, उपराष्ट्रपती यांनी केलं सिंधूचं कौतुक

Indian Shuttler PV Sindhu Wins Swiss Open 2022 Final Title beats Thailand Opponent | PV Sindhu wins Swiss Open 2022: भारताच्या पीव्ही सिंधूने जिंकले स्विस ओपनचे विजेतेपद; थायलंडच्या बुसाननवर वर्चस्व कायम राखलं!

PV Sindhu wins Swiss Open 2022: भारताच्या पीव्ही सिंधूने जिंकले स्विस ओपनचे विजेतेपद; थायलंडच्या बुसाननवर वर्चस्व कायम राखलं!

Next

PV Sindhu wins Swiss Open 2022 Final: भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने स्विस ओपन 2022 स्पर्धा जिंकली. सिंधूने थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफान हिच्यावर सरळ गेममध्ये विजय मिळवून मोसमातील दुसरे महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. सिंधूने ४९ मिनिटांच्या सामन्यात थायलंडच्या प्रतिस्पर्ध्यावर २१-१६, २१-८ अशी सहज मात केली. २०१९च्या हाँगकाँग ओपनमध्ये या प्रतिस्पर्ध्याने तिच्यावर विजय मिळवला होता. पण तिने तो हिशेब चुकता करत बुसाननवर १७ सामन्यांत १६व्यांदा विजय मिळवला. तिच्या या विजयाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि अनेकांनी कौतुक केलं.

----

--

गेल्या वर्षी याच स्पर्धेत सिंधूला रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या स्पेनच्या कॅरोलिना मारिनकडून अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. सिंधूने या वर्षी जानेवारीमध्ये लखनौमध्ये सय्यद मोदी इंटरनॅशनल सुपर ३०० जिंकली होती. सुपर 300 स्पर्धा ही BWF टूर इव्हेंटमधील प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. सिंधूने तीच लय कायम राखत बुसाननवर विजय मिळवला.

Web Title: Indian Shuttler PV Sindhu Wins Swiss Open 2022 Final Title beats Thailand Opponent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.