कोरोना संकटात भारताच्या स्टार धावपटू द्युती चंदवर आली स्वतःची BMW विकण्याची वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 05:35 PM2020-07-11T17:35:26+5:302020-07-11T17:37:07+5:30

2018मध्ये तिनं तेलंगणा येथून 30 लाखांत ही गाडी खरेदी केली होती. 

Indian sprinter Dutee Chand faces lack of funding for Olympic training, to sell luxury car to manage expenses | कोरोना संकटात भारताच्या स्टार धावपटू द्युती चंदवर आली स्वतःची BMW विकण्याची वेळ!

कोरोना संकटात भारताच्या स्टार धावपटू द्युती चंदवर आली स्वतःची BMW विकण्याची वेळ!

Next

संघर्षातून स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचा तिरंगा डौलानं फडकावणाऱ्या धावपटू द्युती चंदवर सध्या संकट ओढावलं आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीसाठीच्या सरावात कोणतीही उणीव राहू नये यासाठी द्युती मेहनत घेत आहे. पण, कोरोना व्हायरसच्या संकटात स्पॉन्सर्स मिळत नसल्यानं तिच्या सरावात खंड पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिनं स्वतःची BMW 3 सीरिज ही महागडी गाडी विकण्याचा निर्णय घेतला आहे.

"RSS अन् NGO दिवसरात्र झटल्यानेच धारावी कोरोनामुक्त, सरकारला श्रेय देणं हा त्यांच्यावर अन्याय" 

कपिल देव, गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला बेन स्टोक्स, नोंदवला विक्रम

ती म्हणाली,''कोरोना व्हायरसमुळे सर्व स्पर्धा रद्द झाल्या आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी स्पॉन्सरशीपही मिळत नाही. मी माझ्याकडील सर्व रक्कम खर्च केली आहे आणि मागील काही महिन्यांपासून मी काही कमवतही नाही. या संकटकाळात नवीन स्पॉन्सर मिळण्याची शक्यताही फार कमी आहे. त्यामुळे गाडी विकण्याचा एकमेव पर्याय माझ्यासमोर आहे.''


भारतीय अॅथलेटिक्स महासंघाच्या नियमानुसार द्युती सराव करत नसल्यामुळे तिला महासंघाकडूनही कोणतीच मदत मिळत नाही. ती राज्य सरकारच्या अत्यारीखाली सराव करत आहे आणि KIIT विद्यापीठ तिला स्पॉन्सर करत आहे, परंतु ऑलिम्पिक स्पर्धेच्या आधीची तारीख डोक्यात ठेवून सर्व रक्कम खर्च झाली आहे. कोरोना व्हायरमुळे ऑलिम्पिक स्पर्धा 2021पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.


BMW ही द्युतीनं खरेदी केलेली पहिली महागडी वस्तू होती, परंतु या काळात तिला ती विकावी लागत आहे. पण, त्यानं ती खचलेली नाही. ''मला दुःख होत नाही. मी स्पर्धेत सहभाग घेत असल्यामुळे ती कार मी खरेदी करू शकले. त्यामुळे पुढेही मी स्पर्धेत सहभागी होईन, पैसे कमवीन आणि माझ्यासाठी नवीन गाडी खरेदी करेन. सध्या 2021चा ऑलिम्पिक हे माझे लक्ष्य आहे,''असे 2018च्या आशियाई स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या द्युतीनं सांगितले. द्युतीला सध्या प्युमा स्पॉन्सर करत आहे आणि त्यांच्यासोबतचा करार डिसेंबरमध्ये संपणार आहे.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राच्या सुपुत्राला सलाम; ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ शेतात गाळतोय घाम!

पुढील महिन्यात सुरू होणार ट्वेंटी-20 लीग; शाहरुख खानच्या संघातून खेळणार प्रविण तांबे!

दिल्ली टू केनिया व्हाया मुंबई; भारताचा क्रिकेटपटू करणार केनियाच्या राष्ट्रीय संघातून पदार्पण?

भारतीय क्रिकेटपटूची आई बनली 'कोरोना वॉरियर'; संकटकाळात करतेय 'बेस्ट' काम!

कोरोना व्हायरसच्या संकटात सुरेश रैना अन् रिषभ पंतची धम्माल मस्ती; Video Viral  

Bad News : इंग्लंडच्या वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूचे निधन; क्रीडा विश्वातून हळहळ

धक्कादायक : भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या पत्नीला झाला कोरोना

Web Title: Indian sprinter Dutee Chand faces lack of funding for Olympic training, to sell luxury car to manage expenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.