राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय टेबल टेनिसपटूंचा धडाका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 12:31 AM2019-07-18T00:31:19+5:302019-07-18T00:31:52+5:30

२१व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेची दमदार सुरुवात करताना यजमान भारताने पुरुष आणि महिला या दोन्ही गटातून सुपर आठ फेरीत प्रवेश केला.

Indian table tennis played well in the Commonwealth Games | राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय टेबल टेनिसपटूंचा धडाका

राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय टेबल टेनिसपटूंचा धडाका

googlenewsNext

कटक : येथे सुरु असलेल्या २१व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेची दमदार सुरुवात करताना यजमान भारताने पुरुष आणि महिला या दोन्ही गटातून सुपर आठ फेरीत प्रवेश केला. विशेष म्हणजे जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय खेळाडूंनी यादरम्यान केवळ दोन गेम गमावले. पुरुषांमध्ये अचंता शरथ कमल याने सिंगापूरच्या जेयू क्लेयरेन्सच्यूविरुद्ध, तर महिलांमध्ये अहलिका मुखर्जीने श्रीलंकेच्या चमातसारा फर्नांडोविरुद्ध प्रत्येकी एक गेम गमावला.
पुरुष गटात संघ व्यवस्थापनाने शरथ कमल, जी. साथियान आणि हरमीत देसाई या अनुभवी खेळाडूंवर भरवसा दाखवला. आपल्यावरील विश्वास सार्थ ठरविताना या तिघांनी प्रथम स्कॅटलंड आणि त्यानंतर सिंगापूर या संघांना प्रत्येकी ३-० असा धक्का दिला. महिलांमध्ये मात्र भारतीय संघाने दोन्ही सामन्यांत वेगळा चमू खेळवला. मनिका बत्रा, अर्चना कामत आणि अहलिका यांनी प्रथम श्रीलंकेला ३-० असे नमविले. यानंतर द. आफ्रिकाविरुद्ध अर्चना, मधुरिका पाटकर आणि सुचित्रा मुखर्जी यांना खेळविण्यात आले. त्यांनी भारताचा सलग दुसरा विजय मिळवताना ३-० अशी बाजी मारली. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Indian table tennis played well in the Commonwealth Games

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.