'चॅम्पियन्स' भारत हॉकीत पुन्हा 'आशियाई किंग्ज' होणार? ट्रॉफीचा बचाव करण्याचे आव्हान, संघ जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 05:53 PM2024-08-28T17:53:54+5:302024-08-28T17:54:07+5:30

चीनमध्ये होत असलेल्या या स्पर्धेत भारतासमोर ट्रॉफीचा बचाव करण्याचे आव्हान असेल.

 Indian team for the Asian Champions Trophy Hockey 2024 has been announced | 'चॅम्पियन्स' भारत हॉकीत पुन्हा 'आशियाई किंग्ज' होणार? ट्रॉफीचा बचाव करण्याचे आव्हान, संघ जाहीर

'चॅम्पियन्स' भारत हॉकीत पुन्हा 'आशियाई किंग्ज' होणार? ट्रॉफीचा बचाव करण्याचे आव्हान, संघ जाहीर

asian champions trophy hockey 2024 : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये कांस्य पदक जिंकल्यानंतर भारताच्याहॉकी संघासमोर पुढील आव्हान म्हणजे आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी... चीनमध्ये होत असलेल्या या स्पर्धेत भारतासमोर ट्रॉफीचा बचाव करण्याचे आव्हान असेल. या स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने बुधवारी आपल्या १८ सदस्यीय संघाची घोषणा केली. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वात पुन्हा एकदा भारत मोठ्या व्यासपीठावर खेळेल. ऑलिम्पिकमध्ये खेळलेल्या १० जणांना संघात जागा मिळाली आहे, तर ५ शिलेदारांना विश्रांती देण्यात आली. (asian champions trophy hockey 2024 schedule)

८ ते १७ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा खेळवली जाईल. यजमान चीनविरुद्धच्या सामन्यातून भारत आपल्या अभियानाची सुरुवात करेल. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ही लढत होईल. विशेष बाब म्हणजे मागील वर्षी विजयाचा मानकरी ठरलेला भारतीय संघ यावेळी ट्रॉफीच्या बचावासाठी भिडेल. मागील वर्षी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत ट्रॉफी जिंकण्याच्या इराद्याने उतरला अन् विजय साकारला.

दरम्यान, भारताचा दिग्गज गोलरक्षक पीआर श्रीजेशच्या निवृत्तीनंतर भारत पहिल्यांदाच खेळेल. ऑलिम्पिक २०२४ संपताच श्रीजेशने निवृत्ती घेतली. त्यामुळे गोलरक्षकाच्या भूमिकेत श्रीजेशच्या जागी कृष्ण बहादूर पाठक आणि सूरज करकेरा यातील एकाला निवडले जाईल. 

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संघ - 
गोलरक्षक - कृष्ण बहादूर पाठक, सूरज करकेरा.
बचावपटू - जरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), जुगराज सिंग, संजय, सुमित.
मिडफिल्डर्स - राज कुमार पाल, नीलकंठ शर्मा, विवेक सागर प्रसाद, मनप्रीत सिंग, मोहम्मद राहील मौसीन.
फॉरवर्ड - अभिषेक, सुखजीत सिंग, अरिजीत सिंग हुंदल, उत्तम सिंग, गुरजोत सिंग. 

Web Title:  Indian team for the Asian Champions Trophy Hockey 2024 has been announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.