भारतीय संघ बलाढ्य आॅस्ट्रेलियाविरुद्ध सज्ज

By admin | Published: May 2, 2017 01:26 AM2017-05-02T01:26:26+5:302017-05-02T01:26:26+5:30

गेल्या लढतीत शानदार विजय मिळवल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय संघाला सुल्तान अझलान शाह कप हॉकी स्पर्धेत

Indian team ready against strong Australian | भारतीय संघ बलाढ्य आॅस्ट्रेलियाविरुद्ध सज्ज

भारतीय संघ बलाढ्य आॅस्ट्रेलियाविरुद्ध सज्ज

Next

इपोह : गेल्या लढतीत शानदार विजय मिळवल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय संघाला सुल्तान अझलान शाह कप हॉकी स्पर्धेत तिसऱ्या राऊंड रॉबिन लढतीत मंगळवारी गत चॅम्पियन आॅस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या लढतीच्या निमित्ताने चमकदार कामगिरी करण्याच्या निर्धाराने भारतीय संघ उतरणार आहे.
सलामी लढतीत ब्रिटेनविरुद्ध २-२ ने बरोबरीवर समाधान मानणाऱ्या भारतीय संघाने त्यानंतर कामगिरीत सुधारणा करताना न्यूझीलंडचा ३-० ने पराभव केला. न्यूझीलंड संघाने पहिल्या लढतीत विश्व चॅम्पियन आॅस्ट्रेलियाला १-१ ने बरोबरीत रोखले होते.
आॅस्ट्रेलियाने रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीत यजमान मलेशियाचा ६-१ ने धुव्वा उडवित आपले वर्चस्व सिद्ध केले. सहा देशांच्या या स्पर्धेत सर्वांत वरचे मानांकन असलेल्या दोन संघांदरम्यान (भारत व आॅस्ट्रेलिया) खेळली जाणारी लढत साखळी फेरीतील सर्वांत महत्त्वाची लढत मानल्या जात आहे.
भारताचे प्रशिक्षक रोलेंट ओल्टमेन्स म्हणाले,‘आम्ही कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहोत. इपोहमध्ये दाखल होण्यापूर्वी आमचा तसा निर्धार होता. आम्ही अनुकूल निकाल मिळवण्यास उत्सुक आहोत.’
पहिल्या लढतीत गोल करण्याची संधी निर्माण करण्यात अपयशी ठरलेल्या आघाडीच्या फळीतील खेळाडूंवर टीका करणाऱ्या ओल्टमेन्स यांनी दुसऱ्या लढतीतील कामगिरीनंतर त्यांची प्रशंसा केली. ओल्टमेन्स पुढे म्हणाले,‘माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे फॉरवर्ड व मिडफिल्ड यांच्यातील ताळमेळ आहे. आमच्या संघात हा ताळमेळ दिसून येत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत आघाडीच्या फळीची कामगिरी उल्लेखनीय होती. यानंतरच्या लढतीत आम्ही यात आणखी सुधारणा करण्यास प्रयत्नशील आहोत.’
ओल्टमेन्स म्हणाले की, ‘डिफेंडर्सनी न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीतील पहिल्या क्वार्टरमधील कामगिरीचे समीक्षण करायला हवे. त्यांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंना अनेकदा चढाई करण्याची संधी दिली. पहिल्या क्वार्टरमधील कामगिरीमुळे मी नाराज झालो. पहिल्या क्वार्टरमध्ये एवढ्या चुका कशा झाल्या, हे न समजण्यासारखे आहे. पहिल्या क्वार्टरमधील चुका सुधारत भारतीय संघाने त्यानंतर सामन्यावर नियंत्रण मिळवले.’ भारताने यापूर्वीच्या लढतीत सात पेनल्टी कॉर्नर मिळवले. त्यातील दोन पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीतने गोल नोंदवले. हरमनप्रीतची आॅस्ट्रेलियन प्रशिक्षक कोरिन बॅच यांनीही प्रशंसा केली. (वृत्तसंस्था)

1दरम्यान, आॅस्टे्रलियन संघानेही भारताविरुध्द कंबर कसली असून ते या सामन्यात भारताला गृहित धरण्याची चूक करणार नाही. भारतीय संघावर बारीक लक्ष ठेवून असलेले आॅस्टे्रलिय प्रशिक्षक यांनी म्हटले की, ‘पेनल्टी कॉर्नर भारताची मजबूत बाजू झाली आहे.’

2जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेला भारत आणि आॅस्ट्रेलिया या संघांना अंतिम फेरीचे प्रबळ दावेदार मानल्या जात आहे. आॅस्ट्रेलियाने ९ वेळा अझलान शाह कप पटकावला आहे. हा संघ जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे.

Web Title: Indian team ready against strong Australian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.