भारतीय प्रशिक्षकांना ‘रिंगसाईड’मध्ये नो एंट्री
By admin | Published: July 17, 2014 12:57 AM2014-07-17T00:57:14+5:302014-07-17T00:57:14+5:30
आंतरराष्ट्रीय मुष्टियोद्धा संघटनेच्या निलंबनावरून भारतीय प्रशिक्षकांना ग्लास्गो येथील राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत ‘रिंगसाईड’ खुर्चीवर बसण्यास आक्षेप घेतला आहे.
मुंबई : आंतरराष्ट्रीय मुष्टियोद्धा संघटनेच्या निलंबनावरून भारतीय प्रशिक्षकांना ग्लास्गो येथील राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत ‘रिंगसाईड’ खुर्चीवर बसण्यास आक्षेप घेतला आहे.
एका सूत्राने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर स्पर्धा आयोजकांनी मंगळवारी भारतीय आॅलिम्पिक संघटनेला तशा प्रकारची सूचनाही केली. असे वाटते, की स्पर्धा आयोजकांनी स्थितीचे चुकीचे आकलन केले आहे. भारतीय मुष्टियोद्धा संघटनेला मार्चमध्ये बरखास्त करण्यात आले होते.
मे महिन्यात त्याच्या जागी बॉक्सिंग इंडियाला अस्थायी मान्यता देण्यात आली होती आणि त्यामुळे प्रशिक्षकांना स्पर्धेदरम्यान खेळाडूंना मदत करण्यावर बंदी घातली होती. ते पुढे म्हणाले, की या खेळाच्या हितासाठी ही समस्या दूर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, भारताचे ८ पुरुष मुष्टियोद्धे आणि ४ प्रशिक्षक ग्लास्गोमध्ये पोहोचले आहेत. तीन महिला खेळाडू २० जुलै रोजी रवाना होतील. मुष्टियुद्ध स्पर्धेला २५ जुलैपासून सुरुवात होईल. (वृत्तसंस्था)