CWG 2022:भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्ण; १९ वर्षीय जेरेमी लालरिनुंगाने रचला इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 04:11 PM2022-07-31T16:11:43+5:302022-07-31T16:13:52+5:30
भारताचा युवा वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगाने राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये भारताला सुवर्ण पदक जिंकून दिले आहे
बर्गिंहॅम : भारताचा युवा वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगाने राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये भारतालासुवर्ण पदक जिंकून दिले आहे. १९ वर्षीय वेटलिफ्टरने पुरूषांच्या ६७ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले आहे. राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये भारताला हे दुसरे सुवर्ण पदक मिळाले आहे. लालरिननुंगा ३०० (१४०+१६० किलो) वजन उचलून इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे जेरेमीने ४ वर्षांमध्ये तिसऱ्यांदा तिरंग्यांची शान वाढवली आहे. त्याने २०१८ मध्ये युवा ऑलिम्पिकमध्ये पदकाशिवाय मागील वर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्ण जिंकले होते. आता पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधून देखील त्याच्याकडून पदकाची अपेक्षा असणार आहे.
So if you want to see very good weightlifting technique then refer to Lalrinnunga Jeremy who is now favourite to win India’s 2nd Gold in @birminghamcg22#TeamIndia . This refine skills is a results of hard graft of years of training pic.twitter.com/boLDQfUzJ2
— Rahul PAWAR (@rahuldpawar) July 31, 2022
भारताच्या खात्यात पाचवे पदक
भारताने आतापर्यंत राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पाच पदके पटकावली आहेत. लक्षणीय बाब म्हणजे ही सर्व पदके वेटलिफ्टिंग मधून मिळाली आहेत. भारताने आतापर्यंत २ सुवर्ण, २ रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकले आहे. महाराष्ट्रातील संकेत सरगरने भारतासाठी पहिले पदक जिंकले आहे.
#CommonwealthGames2022 | Indian weightlifter Jeremy Lalrinnunga wins Gold in Men's 67kg finals. This is India's second gold in Birmingham pic.twitter.com/Q8TAKxyGVM
— ANI (@ANI) July 31, 2022
भारतीय खेळाडू जेरेमी लालरिनुंगा आणि मिराबाई चानू यांनी सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे. तर मराठमोळ्या संकेत सरगरने रौप्य पदक आणि गुरूराजा पुजारीने ६१ किलो वजन श्रेणीमध्ये कांस्य पदक जिंकले आहे. तसेच बिंगियारानी देवीने रौप्य पदक जिंकले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात भारताने आतापर्यंत १३० पदके जिंकली आहेत. भारतापेक्षा जास्त पदके फक्त ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहेत.