भारतीय महिला आॅलिम्पिक पदक जिंकू शकतात!, प्रशिक्षक राफेल बोर्गामास्को यांनी व्यक्त विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 03:44 AM2017-11-25T03:44:14+5:302017-11-25T03:44:24+5:30

बॉक्सिंगमध्ये यशस्वी व्हायला कौशल्य आणि इच्छाशक्ती लागते. जेतेपदाच्या स्वप्नपूर्तीसाठी स्वत:च्या कौशल्यावर तसेच जिंकण्याच्या ठाम निर्धारावर कायम राहिल्यास भारतीय महिला बाॉक्सर विश्व आणि आॅलिम्पिक स्तरावर पदके मिळवू शकतात.

Indian women can win Olympic medal !, coach Rafael Borgas Maska expressed confidence | भारतीय महिला आॅलिम्पिक पदक जिंकू शकतात!, प्रशिक्षक राफेल बोर्गामास्को यांनी व्यक्त विश्वास

भारतीय महिला आॅलिम्पिक पदक जिंकू शकतात!, प्रशिक्षक राफेल बोर्गामास्को यांनी व्यक्त विश्वास

googlenewsNext

- किशोर बागडे
बॉक्सिंगमध्ये यशस्वी व्हायला कौशल्य आणि इच्छाशक्ती लागते. जेतेपदाच्या स्वप्नपूर्तीसाठी स्वत:च्या कौशल्यावर तसेच जिंकण्याच्या ठाम निर्धारावर कायम राहिल्यास भारतीय महिला बाॉक्सर विश्व आणि आॅलिम्पिक स्तरावर पदके मिळवू शकतात. पुरुषी वर्चस्वाला शह देणाºया या खेळात भारताच्या महिला खेळाडू लवकरच स्वत:चा वेगळा ठसा उमटवतील, असा ठाम विश्वास युवा बॉक्सिंग संघाचे ऊर्जावान मुख्य कोच तसेच हाय परफॉर्मन्स संचालक राफेल बोर्गामास्को यांनी व्यक्त केला आहे.
विश्व यूथ महिला बॉक्सिंग स्पर्धेनिमित्त गुवाहाटीत असलेले इटलीचे राफेल यांनी चारच महिन्यांपूर्वी भारतीय महिला युवा बॉक्सर्सना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी स्वीकारली. पण इतक्या कमी कालावधीत त्यांंनी खेळाडूंच्या हृदयात स्थान मिळविले. आश्वासक सुरुवात केल्यामुळे भारतीय संघातील सर्वच खेळाडू त्यांना भारतीय कोच संबोधतात. त्यांंनी बºयापैकी हिंदी शिकून घेतले आहे. खेळाडूंमध्ये झालेल्या सुधारणा, भाषेचा अडसर, आहार आणि कोचिंग याबाबत ते भरभरून बोलले.
बॉक्सिंग विश्व भारतीय महिलांकडे मोठ्या आशेने पाहते, असे सांगून ते म्हणाले, ‘मेरीकोमसह अनेक भारतीय बॉक्सर्सनी जागतिक स्तरावर दबदबा निर्माण केला. खेळाडूंची शारीरिक स्थिती उंचाविण्याचे काम आधी व्हायला हवे. व्हिडीओ रेकॉर्डिंग पाहण्यावर आपला विश्वास नाही. त्यापेक्षा योग्य आहार आणि कोचिंग याची सांगड घालणे गरजेचे आहे. भाारतीय महिला फार आज्ञाधारक आहेत. मला खेळाडूंकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. मी बॉक्सिंगमधून पैसा कमविणारा प्रशिक्षक नाही. बॉक्सिंगचे हित साधण्याची भूक असल्यामुळेच प्रशिक्षणासाठी भारताला पसंती दिली.’
राफेल यांचे वडील अर्नेस्ट बोर्गामास्को ‘नॉक आऊट’ बॉक्सर होते. राफेल हे स्वत: पोलीस खात्यात होते. भारतीेय संस्कृतीची कायम ओढ राहिलेले राफेल हे भारतीय संघाशी जुळल्यानंतर सर्वप्रथम भोपाळच्या साई केंद्रात जाऊन आले. त्यांनी तेथे काही सुधारणा सुचविल्या. विश्व स्पर्धेसाठी गेले तीन महिने खेळाडूंवर त्यांनी मेहनत घेतली. या काळात खेळाडूंची मानसिकता समजून घेत भरारी घेण्यासाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागेल, ही भावना त्यांच्यात रुजविली. मोबाइल, टीव्ही यापासून दूर राहण्याची सूचना केली; शिवाय त्यावर अंमल केला. आइसक्रीम खाऊ नका, असा सल्ला दिला.
खेळाडू व प्रशिक्षकातील समन्वय किती परिणामकारक ठरू शकतो, असे विचारताच ते म्हणाले, ‘बॉक्सर रिंगणात एकटा लढतो हे खरे आहे. पण त्याला सज्ज करण्यासाठी अनेक हात राबत असतात. प्रशिक्षक, फिजिओ, सहायक कोचेस, डॉक्टर, आहारतज्ज्ञ या सर्वांचा यशात वाटा असतो. बॉक्सर तयार करणे म्हणजे ‘सांघिक कामगिरी’ आहे.
>राफेल यांना दोन मुली आहेत. मोठी २३ वर्षांची कन्या इटलीच्या राष्टÑीय व्हॉलिबॉल संघात आहे. धाकटी १६ वर्षांची कन्या इटलीतच असून, पत्नी मरियानेवेसोबत ते येथे आले आहेत. या स्पर्धेनंतर राफेल चार दिवसांसाठी इटलीला परतणार असून, त्यानंतर युवा महिला बॉक्सिंगमधील ‘नवे टॅलेंट’ शोधणार आहेत. पुढील तीन - चार वर्षांत भारतीय बॉक्सर आणखी शिखर गाठतील, असा विश्वास राफेल यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Indian women can win Olympic medal !, coach Rafael Borgas Maska expressed confidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.