भारतीय महिला अंतिम सामन्यासाठी सज्ज

By admin | Published: February 21, 2017 12:31 AM2017-02-21T00:31:11+5:302017-02-21T00:31:11+5:30

आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आपला प्रवेश निश्चित केल्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका कोणत्याही दडपणाशिवाय

Indian women ready for the final | भारतीय महिला अंतिम सामन्यासाठी सज्ज

भारतीय महिला अंतिम सामन्यासाठी सज्ज

Next

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आपला प्रवेश निश्चित केल्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका कोणत्याही दडपणाशिवाय विश्वचषक पात्रता फेरीच्या अंतिम सामन्यात एकमेकांविरुद्ध लढतील. विश्वचषक स्पर्धेत जागा निश्चित झाल्याने दोन्ही संघ कोणत्याही दडपणाशिवाय आपला सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करतील.
पात्रता स्पर्धेच्या सुपरसिक्स फेरीच्या गुणतालिकेत भारतीय महिला अव्वल स्थानी राहिल्या, तर दक्षिण आफ्रिकेने दुसरे स्थान पटकावले. दहा संघांच्या या स्पर्धेत या दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच चमकदार कामगिरी केली. तसेच, या स्पर्धेतील अव्वल चार संघांनी केवळ विश्वचषक स्पर्धेत प्रवेश मिळवला नसून आयसीसी महिला चॅम्पियनशिप स्पर्धेतही आपली जागा निश्चित केली आहे. भारत व दक्षिण आफ्रिकेव्यतिरिक्त श्रीलंका आणि पाकिस्तान यांनी विश्वचषक व चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. त्याचप्रमाणे, बांगलादेश आणि आयर्लंड यांनी स्पर्धेत सुपरसिक्स फेरीत धडक मारून पुढील चार वर्षांसाठी आपला एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा कायम राखला आहे. स्पर्धेत भारतीय संघ अपराजित असून, दक्षिण आफ्रिकेनेही केवळ भारताचा अपवाद वगळता इतर सर्व प्रतिस्पर्ध्यांना नमवले आहे.
अंतिम सामन्याविषयी भारताची कर्णधार मिताली राजने सांगितले, ‘‘आमची गोलंदाजी, खासकरून फिरकी गोलंदाजी चांगली होत आहे.

Web Title: Indian women ready for the final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.