भारतीय महिला संघ चीनला रवाना आशियाई बास्केटबॉल : अनिता दुराईकडे नेतृत्व

By admin | Published: August 27, 2015 11:45 PM2015-08-27T23:45:20+5:302015-08-27T23:45:20+5:30

मुंबई : वूहान (चीन) येथे २९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान रंगणार्‍या २६ व्या आशियाई बास्केटबॉल स्पर्धेसाठी भरताचा महिला संघ बुधवारी रात्री रवाना झाला. प्रमुख प्रशिक्षक फ्रॉन्सिको गार्सिया आणि सहाय्यक प्रशिक्षक अर्पणा घोष यांच्यासह १२ सदस्यांचा संघात समावेश आहे.

Indian women team leaves for China Asian Basketball: Lead to Anita Durai | भारतीय महिला संघ चीनला रवाना आशियाई बास्केटबॉल : अनिता दुराईकडे नेतृत्व

भारतीय महिला संघ चीनला रवाना आशियाई बास्केटबॉल : अनिता दुराईकडे नेतृत्व

Next
ंबई : वूहान (चीन) येथे २९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान रंगणार्‍या २६ व्या आशियाई बास्केटबॉल स्पर्धेसाठी भरताचा महिला संघ बुधवारी रात्री रवाना झाला. प्रमुख प्रशिक्षक फ्रॉन्सिको गार्सिया आणि सहाय्यक प्रशिक्षक अर्पणा घोष यांच्यासह १२ सदस्यांचा संघात समावेश आहे.
सात वेळा आशियाई स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार्‍या अनुभवी अनिता पी. दुराईकडे भारतीय महिला संघाच्या नेतृत्वपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. २०१२ साली अशियाई बीच बास्केटबॉल स्पर्धेत अनिताच्या नेतृत्वाखाली भारताने सुवर्णपदकावर नाव कोरले होते. अनितासह महाराष्ट्राच्या शिरीन लिमयेच्या खेळाकडे संघाची नजर असेल. शिवाय केरळच्या जीना पी.एस., पुजामाल के.एस. , यांच्यासह स्टेफी निक्सन या अनुभवी खेळाडूंच्या कामगिरीवर देखील संघाची मदार असेल. तामिळनाडूच्या श्रीविद्या, महाराष्ट्राच्या श्रृती मेनन आणि उत्तरप्रदेशच्या बरखा सोनकर या तरुण खेळाडूंच्या समावेश करुन भारतीय संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा ताळमेळ साधण्यात आला आहे. जागतिक ज्युनियर स्पर्धेत भारताकडून खेळलेल्या छत्तीसगढच्या १९ वर्षीय कविता अकुल व कर्नाटकच्या १७ वर्षीय भंडाव्या एच.एम. यांचा खेळ देखील भारतासाठी निर्णायक ठरेल. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Indian women team leaves for China Asian Basketball: Lead to Anita Durai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.