भारतीय महिला संघ विजयी

By admin | Published: March 13, 2016 04:20 AM2016-03-13T04:20:48+5:302016-03-13T04:20:48+5:30

स्मृती मानधना (२८ चेंडूंत ५ चौकार, १ षटकार मारून नाबाद ४२ धावा), वेलास्वामी वनिता (३४ चेंडूंत ३ चौकार १ षटकार मारून ३७ धावा) आणि कर्णधार मिताली राज

Indian women team won | भारतीय महिला संघ विजयी

भारतीय महिला संघ विजयी

Next

बंगळुरू : स्मृती मानधना (२८ चेंडूंत ५ चौकार, १ षटकार मारून नाबाद ४२ धावा), वेलास्वामी वनिता
(३४ चेंडूंत ३ चौकार १ षटकार मारून ३७ धावा) आणि कर्णधार मिताली राज (२३) यांच्या आक्रमक फटकेबाजीमुळे भारतीय महिला क्रिकेट संघाने सराव सामन्यात श्रीलंका संघाचा ८ विकेटनी पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका महिलांनी २० षटकांत ४
बाद १२५ धावा केल्या. १२६
धावांचे आव्हान भारतीय महिलांनी १७.५ षटकांत २ बाद १२८ धावा
करून विजय संपादन केला.
श्रीलंका संघाकडून सुरंगीकाने ४३
व कौशल्याने ३४ धावा केल्या. भारताकडून दीप्ती शर्माने दोन, शिखा पांडे व पूनम यादवने प्रत्येकी एक बळी मिळविला.
(वृत्तसंस्था)

Web Title: Indian women team won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.